Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Real Estate Plot Investment : जमिनीत पैसे गुंतवणं सुरक्षित आहे? प्लॉट खरेदी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Real Estate Plot Investment : रिअल इस्टेटमध्ये जमीन किंवा प्लॉट खरेदी करणे नेहमीच फायदेशीर ठरते असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, अनेक अडचणींमुळे प्लॉटमधील गुंतवणूक अडकू शकते. प्लॉट खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष्य द्यायला हवं?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 31, 2026 | 03:24 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीत पैसे गुंतवणं सुरक्षित आहे का?
  • प्लॉट खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या
  • प्लॉट खरेदीचे काय तोटे आहेत?
Real Estate Plot Investment : भविष्याच्या सुरक्षेसाठी आपण गुंतवणूक करतो. ही गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारची असते. बऱ्याच जणांचा असा समज असतो की जमी खरेदी करणं हा नेहमी शहाणपणाचा निर्णय आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूकदारांमध्ये अनेकदा असाच समज असतो. बऱ्या वेळेला अनेकांना असं वाटतं की जमिनीच्या प्लॉटची किंमत कालांतराने वाढत जाते आणि त्यामुळे फ्लॅटच्या तुलनेत अधिक फायदेशीर गुंतवणूक ठरते. पण खरंच ही गुंतवणूक इतकी सोयीची ठरते का? पण प्रत्येक प्लॉट हा चांगली गुंतवणूक नसतो. नेमके असे कोणते निकष आहेत जे यासाठी योग्य की अयोग्य ठरवतात? ( Real Estate Plot Investment )

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव

प्लॉट खरेदीचे काय तोटे आहेत?

सर्वसाधारणपणे, कोणत्याही मालमत्तेतून मिळणारा रिटर्न हा पूर्णपणे तिचे स्थान, परिसरातील विकास आणि गुंतवणुकीची वेळ या गोष्टींवर अवलंबून असतो. प्लॉट खरेदी केल्यामुळे तुम्हाला भविष्यात तुमच्या विशिष्ट गरजांनुसार घर बांधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या प्लॉटमधून दीर्घकाळात उत्तम रिटर्नही मिळवून देतात. मात्र मोकळ्या जमिनीतून सहसा कोणतेही भाड्याचे उत्पन्न मिळत नाही. शिवाय, जर आसपासचा परिसर डेव्हलप नसेल तर अनेक वर्षे त्या प्लॉटच्या मूल्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नसते. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही केलेली गुंतवणूक फसते.

फ्लॅट खरेदी करण्याचे फायदे काय आहेत?

फ्लॅट खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भाड्याच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळण्याची असलेली आशा. जर तुमची मालमत्ता अशा ठिकाणी असेल जिथे भाडं जास्त आहे त्याठिकाणी तुम्ही ताबा मिळाल्यानंतर लगेच कमाई सुरू करू शकता. याशिवाय त्याठिकाणी डिमांडही जास्त असते. फ्लॅटमध्ये ताबडतोब राहण्याची सुविधा देखील मिळते, तर प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी वेळ आणि पैशाची स्वतंत्र गुंतवणूक आवश्यक असते. त्यामुळे फक्त फ्लॅटमध्ये गुंतवणूक उपयोगाची नाही तर त्याचबरोबर इतर गोष्टी विकसित करताना आणखी गुंतवणूकीची गरज भासते.

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि भविष्यात मोठा रिटर्न मिळवायचा असेल तर प्लॉट हा पर्याय असू शकतो. दुसरीकडे, जर तुम्हाला उत्पन्न मिळवायचे असेल, तर तुमच्यासाठी फ्लॅट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. त्याच बरोबर त्या जागेचं स्थान कुठे आहे? आणि जाण्याची वाट आहे की नाही यांसारख्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नकात.

1 September 2026 Rule Changes : 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; LPG, दूध, ITR सह …

Web Title: Real estate plot investment buying tips and hidden risks explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • investment
  • real estate

संबंधित बातम्या

Mumbai Housing Redevelopment : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण? पुढील 15-20 वर्षांत 30 लाख नव्या घरांची निर्मिती
1

Mumbai Housing Redevelopment : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण? पुढील 15-20 वर्षांत 30 लाख नव्या घरांची निर्मिती

Mumbai Expensive Deal : महिना 28.5 लाख रुपये भाडे; DMart चे राधाकिशन दमानीया यांच्या कंपनीचा मुंबईत सर्वांत महागडा व्यवहार
2

Mumbai Expensive Deal : महिना 28.5 लाख रुपये भाडे; DMart चे राधाकिशन दमानीया यांच्या कंपनीचा मुंबईत सर्वांत महागडा व्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.