Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल मंत्री पदी नियुक्त झाल्यावर प्रथमच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट देवून महसूल विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

  • By नारायण परब
Updated On: Dec 23, 2024 | 09:10 PM
जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Follow Us
Close
Follow Us:

महसूल विभागाकडून  सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून त्यानुरुप जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा. अशी सुचना करतांना महसूल विभागाला आवश्यक असलेले  मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महसूल मंत्री पदी नियुक्त झाल्यावर प्रथमच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट देवून महसूल विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा बावनकुळे यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सादरीकरणाद्वारे योजनांची माहिती दिली.

BCAS कडून मुंबईमध्‍ये सीए मॅरेथॉनचे आयोजन; 1600 हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग

अपर महसूल आयुक्त डॉ.माधवी खोडे, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, राजलक्ष्मी शहा, उपायुक्त सर्वश्री डॉ.कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, मनोज शहा, अनिल गोतमारे, अनिल बनसोड, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

नागपूर महसूल विभागात अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच नायब तहसिलदार आदी संवर्गनिहाय रिक्त असलेल्या पदांचा बावनकुळे यांनी आढावा घेतला. विभागाच्या आकृतीबंधानुसार रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वस्थ केले. नागपूर विभागाला 70 हजार 135 कोटींचे महसूल उद्ष्टि देण्यात आले होते. त्यापैकी 35 हजार 851 कोटींची वसुली पूर्ण झाली आहे. उर्वरित वसुली मार्च पूर्वी पूर्ण करावीत, अशा सुचना त्यांनी यावेळी केली.

वाळू विक्री धोरणानुसार विभागात 42 डेपोमधून वाळू सुरु आहे. 7 लाख 78 हजार 497 ब्रास वाळुचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 5 लाख 25 हजार 676 ब्रास वाळू जनतेला उपलब्ध झाली आहे. वाळू वाहतूक व उपस्यामधील काळाबाजारमुळे जनतेला सुलभपणे वाळू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी. यासंदर्भात मागणीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्याच्या तत्वावर विचार करण्यात येत असून यासाठी नेमलेल्या नाशिक विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न गोसिखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन, विभागीय वन हक्क समितीवरील अपिलाची सुनावणी, विविध महसूल प्रकरणे, भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देणे तसेच नोंदणी अनुदान विभागाच्या दैनंदिन कामे अशा एकूण ११ विषयांचा  आढावा यावेळी घेण्यात आला.

प्रारंभी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्वागत करुन नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक शुल्क आदी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा सादर केला. विविध योजना राबवित असतांना येणाऱ्या अडचणी तसेच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबतची माहिती महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना सादर करण्याची सूचना केली.

BCAS कडून मुंबईमध्‍ये सीए मॅरेथॉनचे आयोजन; 1600 हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग

Web Title: Revenue minister chandrashekhar bawankule has directed to increase efficiency to provide fast and efficient services to the public

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 09:10 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule

संबंधित बातम्या

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
1

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे…ही अपरिपक्वतेची लक्षणे; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?
2

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे…ही अपरिपक्वतेची लक्षणे; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘ओबीसी समाजाचे आरक्षण…’
3

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘ओबीसी समाजाचे आरक्षण…’

जरांगे पाटलांच्या ‘त्या’ विधानाचा बावनकुळेंनी घेतला समाचार; म्हणाले, ‘सरकारला…’
4

जरांगे पाटलांच्या ‘त्या’ विधानाचा बावनकुळेंनी घेतला समाचार; म्हणाले, ‘सरकारला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.