Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ मराठमोळ्या कंपनीची शेअर बाजारात जोरदार एन्ट्री; पहिल्याच दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील साडी विक्री करणारी कंपनी सरस्वती साडी डेपोचा आयपीओ 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत खुला झाला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या आयपीओची किंमत 152-160 रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली असताना, लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या शेअरने 200 रुपयांवर उसळी घेतली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 20, 2024 | 04:47 PM
'या' मराठमोळ्या कंपनीची शेअर बाजारात जोरदार एन्ट्री; पहिल्याच दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!

'या' मराठमोळ्या कंपनीची शेअर बाजारात जोरदार एन्ट्री; पहिल्याच दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एका साडी विक्री करणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात दमदार पदार्पण केले आहे. कंपनीच्या शेअरमुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. सरस्वती साडी डेपो असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीचे शेअर्स मंगळवारी (ता.२०) शेअर बाजारात लिस्टींग झाले आहेत. कंपनीचा हा शेअर 25 टक्के प्रीमियमसह मुंबई शेअर बाजारात (बीएसई) झाला आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांना कंपनीच्या प्रत्येक शेअरवर 40 रुपये नफा झाला आहे.

आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद

सरस्वती साडी डेपो या कोल्हापुर येथील साडी विक्री करणाऱ्या कंपनीचा आयपीओ नुकताच 12 ऑगस्ट रोजी खुला झाला होता. ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी 14 ऑगस्टपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी होती. या आयपीओद्वारे कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10,000,800 शेअर्ससाठी विक्रीसाठी ठेवले होते. विशेष म्हणजे कंपनीच्या या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – देशात कोण भरते सर्वाधिक टॅक्स, अंबानी की अदानी? धोनी पहिल्या तर अक्षय कुमार दुसऱ्या क्रमांकावर

किती रुपयांवर झालीये शेअरची लिस्टिंग

सरस्वती साडी डेपो कंपनीच्या शेअर्सच्या आयपीओची किंमत 152-160 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी (ता.२०) या शेअरची किंमत बीएसईवर 200 रुपयांवर पोहोचली आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर सरस्वती साडी डेपोचे शेअर्स 21.25 टक्के प्रीमियमसह 194 रुपयांवर लिस्टिग झाले आहे. दरम्यान, बाजार तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 200 ते 210 रुपयांच्या आसपास लिस्टिंग होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

हेही वाचा – घरभाडे महिना 40 लाख; स्विमिंग पूल, प्रायव्हेट स्पा, सिनेमागृहासारख्या सुविधा; मुंबईतील ‘या’ घराची जगभर चर्चा!

पहिल्याच दिवशी प्रत्येक लॉटवर 3600 रुपये नफा

सरस्वती साडी कंपनीच्या आयपीओअंतर्गत 90 शेअर्सची लॉट साइज सेट करण्यात आली होती. अर्थात गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान 14,400 रुपये गुंतवणे आवश्यक होते. ज्यातून गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी प्रत्येक लॉटवर तब्बल 3600 रुपये नफा झाला आहे. आयपीओअंतर्गत ज्या गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावली होती आणि 1170 शेअर्ससाठी 1,87,200 रुपये गुंतवले होते. त्यांना पहिल्याच या कंपनीच्या शेअरमुळे 2,34,000 रुपये इतका फायदा झाला आहे.

काय करते ही कंंपनी

साडी उत्पादनाशी निगडित ही कोल्हापूरची कंपनी महिलांच्या कपड्यांचा पुरवठा करते. यामध्ये लेहेंगा, कुर्ती आणि महिलांच्या इतर कपड्यांचा समावेश आहे. ही कंपनी 1966 मध्ये स्थापन झाली आणि तिचा व्यवसाय देशभर पसरलेला आहे. या कंपनीचा 90 टक्क्यांहून अधिक महसूल केवळ साड्यांच्या विक्रीतून येतो.

Web Title: Saraswati saree depo from kolhapur share is booming giving solid returns to investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • IPO

संबंधित बातम्या

या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ सुरू होत आहेत, किंमत पट्टा; सबस्क्रिप्शनची तारीख जाणून घ्या
1

या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ सुरू होत आहेत, किंमत पट्टा; सबस्क्रिप्शनची तारीख जाणून घ्या

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा
2

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा

IPO News: अरे वाह! ‘या’ आयपीओचा GMP अजूनही मजबूत, गुंतवणूकदारांनी केली स्पर्धा
3

IPO News: अरे वाह! ‘या’ आयपीओचा GMP अजूनही मजबूत, गुंतवणूकदारांनी केली स्पर्धा

BlueStone Jewellery IPO च्या जीएमपीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नाही, सबस्क्रिप्शन स्टेटस आणि इतर तपशील तपासा
4

BlueStone Jewellery IPO च्या जीएमपीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नाही, सबस्क्रिप्शन स्टेटस आणि इतर तपशील तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.