Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

रेवंता खादी फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कावडी येथे आयोजित महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 04, 2026 | 04:50 PM
Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप
Follow Us
Close
Follow Us:
  • खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं,
  • कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप
वाई: आजच्या काळात महिलांनी केवळ बचतीवर अवलंबून न राहता उद्योजकता जोपासली पाहिजे, खादी हा केवळ कापड प्रकार नसून ती एक विचारधारा आहे, ज्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. महिलांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून स्वतःचे छोटेखानी उद्योग सुरू करावेत, जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी पाबळे यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी केवळ चूल आणि मूल यामध्ये न अडकता स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावे, या उद्देशाने रेवंता खादी फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कावडी येथे आयोजित महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी संदीप पाबळे आणि ऋषी होळकर यांनी देखील उपस्थित महिलांना प्रोत्साहित करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. प्रशिक्षिका म्हणून सी.आर.पी. सीमा रांजणे यांनी महिलांना व्यवसायातील बारकावे आणि तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यास मोलाची मदत केली. या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. कार्यक्रमाला सुनीता बेलोशे, सुजाता गोळे, शोभा रांजणे, शोभा मानकुमरे, सुलभा मानकुमरे, लीलाबाई मानकुमरे, बेबी धनावडे, शुभांगी राजपुरे, सुजाता मानकुमरे, सुरेखा मानकुमरे यांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आम्रपाली ग्रुपवर ईडी फास आवळला, 99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई

‘दापवडी ‘ला रेवता फाऊंडेशन गाव घेणार दत्तक

रेवंता खादी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून ‘दापयडी’ हे गाव दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात आहे. या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक घराला खादीच्या धाग्याशी जोडण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून येथील प्रत्येक महिलेला खादी विणकाम आणि धागा निर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ प्रशिक्षण देऊन न बांबता, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे दापवडी भविष्यात ‘खादीचे गाव म्हणून ओळखले जाईल. या निर्णयामुळे गावातील महिलांना घराबाहेर न पडता सन्मानाने रोजगार मिळणार असून, आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने दापवडी गावाचे हे पाऊल इतर गावासांठी आदर्श ठरणार आहे.

प्रशिक्षण घेऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध

सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी पाबळे यानी खादी आणि ग्रामोद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा मार्ग अधोरेखित केला, पाबळे गेल्या अनेक दिवसांपासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जमिनीवर काम करत आहेत. खादीच्या माध्यमातून त्यांनी केवळ धागा बनवण्याचेच नव्हे, तर खादीपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रगत प्रशिक्षण घेऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिलांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमाणपत्र हातात पडल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि स्वावलंबनाची जिद्द दिसून येत होती.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल, एका क्लिकवर जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Web Title: Satara news women should become self reliant through khadi womens business training camp concludes at kavadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

सांगा आम्ही काय गुन्हा केला? ‘उचल्या’ पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनात सवाल
1

सांगा आम्ही काय गुन्हा केला? ‘उचल्या’ पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनात सवाल

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ;  श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं
2

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ; श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं

Maharashtra Politics: ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य
3

Maharashtra Politics: ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
4

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.