
एसबीआय अहवाल! आयपीओमधील पैसे संपल्यामुळे बँक कर्जाची मागणी वाढणार
SBI Bank Loan: भारतातील बँकिंग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका नवीन अहवाल सादर केले आहे. एसबीआयने त्या अहवालात असे म्हटले आहे की, काही काळापासून मंदावलेले बँक कर्ज वाटप आता पुन्हा वाढणार आहे. कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी निधीची आवश्यकता असल्याने कर्जाची मागणी देखील वाढण्याची शक्यता असल्याचे, त्यांनी अहवालात म्हटले आहे.
एसबीआयने स्पष्ट केले आहे की, कर्ज मागणीत अलिकडेच झालेली घट ही मोठी समस्या नव्हती, तर ती तात्पुरती होती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेअर बाजारात आयपीओचा पूर आला होता. अनेक कंपन्यांनी आयपीओद्वारे भरपूर पैसे उभारले होते. त्यामुळे कंपन्या जास्त प्रमाणात कर्ज घेत नव्हती.
हेही वाचा : Rising Jet Fuel Costs: इंधन बाजारात मोठी उलथापालथ! जेट इंधन महागलं 5.4% पण व्यावसायिक LPG झाला स्वस्त
जेव्हा भारतीय कंपनीच्या खिशात स्वस्त आयपीओ पैसे होते, तेव्हा कंपन्यांना वाटले की, बँकांकडून कर्ज का घ्यावे आणि व्याज का द्यावे? त्यांनी त्या पैशाचा वापर त्यांचे व्यवहार मिटवण्यासाठी आणि जुने कर्ज फेडण्यासाठी केला. म्हणूनच बँक व्यवसाय थोडा मंदावला होता. मात्र, आता एसबीआयच्या ताज्या अहवालानुसार, आयपीओचे पैसे जवळजवळ खर्च झाले आहेत, त्यामुळे कंपन्यांना पुन्हा बँकांशी संपर्क साधावा लागेल. यामुळे मात्र भारतीय बँक क्षेत्रात आनंदाची लाट आली आहे.
हेही वाचा : Income Tax Notices: आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही ‘किती’ प्रकारच्या असतात नोटिस?
एसबीआयने जुने रेकॉर्ड तपासले तेव्हा, एक मनोरंजक निष्कर्ष समोर आला. आयपीओ आणि बँक कर्जामध्ये थेट एक-एक करून पैसे उभे करण्याचा संबंध नसला तरी, अनेकदा असे दिसून आले आहे की हे दोन्ही विरुद्ध दिशेने जातात. ज्या काळात कंपन्यांनी आयपीओद्वारे जास्त पैसे उभे केले, त्या काळात त्यांनी बँकांकडून कमी कर्ज घेतले. जेव्हा शेअर बाजारातून पैसे उपलब्ध असतात तेव्हा बँकेकडे कोण जाईल? डेटावरून असे दिसून येते की, आयपीओने भरभराट झालेल्या क्षेत्रांनीही कमी बँक कर्जे घेतली. या क्षेत्रांमध्ये वित्त, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स, टेलिकॉम, ग्राहकोपयोगी वस्तू आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे.