Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI ची मोठी कारवाई, ‘या’ कंपनीवर शेअर बाजारात बंदी; ४८४३ कोटी रुपये जप्त होणार

एप्रिल २०२४ मध्ये काही वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे सेबीने चौकशी सुरू केली. अहवालात म्हटले आहे की जेन स्ट्रीटवर भारतीय बाजारपेठेत बेकायदेशीर व्यवसाय केल्याचा आरोप होता. जेन स्ट्रीट ग्रुपने कमावलेला नफा जप्त केला जाईल

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Jul 04, 2025 | 12:52 PM
SEBI ची मोठी कारवाई, 'या' कंपनीवर शेअर बाजारात बंदी; ४८४३ कोटी रुपये जप्त होणार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

SEBI ची मोठी कारवाई, 'या' कंपनीवर शेअर बाजारात बंदी; ४८४३ कोटी रुपये जप्त होणार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बाजार नियामक सेबीने गुरुवार, ३ जुलै रोजी एक महत्त्वाचा आदेश जारी केला, ज्यामध्ये जेन स्ट्रीट ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या जेएसआय इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, जेएसआयर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, जेन स्ट्रीट सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड आणि जेन स्ट्रीट एशिया ट्रेडिंग लिमिटेड यांना शेअर बाजारात व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली.

सेबीच्या मते, या कंपन्यांना यापुढे शेअर्स खरेदी, विक्री किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करण्याची परवानगी राहणार नाही. यापूर्वी सेबीने जेन स्ट्रीट ग्रुपला हेराफेरीचे व्यवहार थांबवण्याचा इशारा दिला होता.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, महागाई भत्त्यात होईल ‘इतकी’ वाढ

बेकायदेशीर नफा जप्त केला जाईल

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की जेन स्ट्रीट ग्रुपने कमावलेला ४,८४३ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा जप्त केला जाईल. कंपन्यांना ही रक्कम भारतातील मान्यताप्राप्त बँकेतील एस्क्रो खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जेन स्ट्रीटच्या बँक खात्यांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. आता सेबीच्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार शक्य होणार नाही.

तीन महिन्यांचा कालावधी

जेन स्ट्रीटला पुढील तीन महिन्यांत किंवा त्यांची मुदत संपण्याच्या वेळेपर्यंत (जे आधी असेल) सर्व ओपन ट्रेडिंग पोझिशन्स बंद करावे लागतील. म्हणजेच, कंपनीला त्यांचे सर्व प्रलंबित सौदे बंद करावे लागतील.

कॅश इक्विल्युअल्स म्हणजे काय?

फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगमध्ये, “कॅश इक्विल्युअल्स” म्हणजे अशा गोष्टी ज्या सहजपणे रोखीत रूपांतरित केल्या जाऊ शकतात, जसे की अल्पकालीन गुंतवणूक. व्यापारी बहुतेकदा त्यांचा वापर तारण किंवा मार्जिन म्हणून करतात. यामुळे त्यांना व्याज मिळवता येते आणि F&O ट्रेड देखील करता येतात. जेन स्ट्रीटवर बाजारपेठेत फेरफार करण्यासाठी या पद्धतींचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

एप्रिल २०२४ मध्ये काही वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे सेबीने चौकशी सुरू केली. अहवालात म्हटले आहे की जेन स्ट्रीटवर भारतीय बाजारपेठेत बेकायदेशीर व्यवसाय केल्याचा आरोप होता. सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) ला जेन स्ट्रीटच्या ट्रेडिंगची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

एनएसईने जेन स्ट्रीटचा चौकशी अहवाल सेबीला सादर केला. सेबीने असे निरीक्षण नोंदवले की आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (एक्सपायरी डे) बाजारात असामान्य अस्थिरता दिसून येत होती आणि काही कंपन्या (विशेषतः जेन स्ट्रीट) उच्च-जोखीम असलेल्या व्यवहारांमध्ये प्रवेश करत होत्या.

सेबीला जेन स्ट्रीट नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले. एनएसईने कंपनीला हेराफेरीचे व्यवहार थांबवण्याचा इशारा पाठवला. जेन स्ट्रीटने इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा मोठे व्यवहार केले, त्यानंतर आता सेबीने ही कठोर कारवाई केली आहे.

Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी दिले हे संकेत

Web Title: Sebis big action this company banned from the stock market rs 4843 crores will be confiscated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • Business News
  • sebi
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
1

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा
2

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण
3

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ
4

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.