Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी दिले हे संकेत
4 जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गुरुवारी 3 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला. गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात सुपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज वर्तवणात आला आहे. शिवाय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे.
तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले, तर अमेरिकन शेअर बाजार वधारला, एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक विक्रमी उच्चांकावर बंद झाले. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुरुवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. गुरुवारी बेंचमार्क निफ्टी ५० २४,४०० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स १७०.२२ अंकांनी किंवा ०.२०% ने घसरून ८३,२३९.४७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४८.१० अंकांनी किंवा ०.१९% ने घसरून २५,४०५.३० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २०७.२५ अंकांनी किंवा ०.३६% ने घसरून ५६,७९१.९५ वर बंद झाला. गुरुवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, सतत दुसऱ्या सत्रात विक्रीचा जोर वाढला आणि त्यामुळे बाजार घसरला. सेन्सेक्स अचानक घसरल्याने गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागलं. गुरुवारी डॉ. रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल्स आणि हिरो मोटोकॉर्प या शेअर्सनी निफ्टीवर अव्वल कामगिरी केली. एसबीआय लाईफ, कोटक बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांना विक्रीच्या दबावाचा फटका बसला.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना संदूर मॅंगनीज, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. वेदांत, मारिको, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX), बंधन बँक, एनबीसीसी इंडिया, आरबीएल बँक, बजाज हाऊसिंग फायनान्स, हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करणाऱ्या शेअर्समध्ये लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स , ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक आणि मदरसन सुमी वायरिंग इंडिया यांचा समावेश आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना सॅक्सॉफ्ट लिमिटेड, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अँड असेंब्लीज लिमिटेड, अॅक्सिस बँक, टाटा केमिकल्स लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, बीएसई लिमिटेड, शोभा लिमिटेड आणि चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड हे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची शिफारस केली आहे.