
Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर 'हे' 8 शेअर्स
मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ३०७.२४ अंकांनी, म्हणजेच ०.४० टक्क्यांनी घसरून ७६,९५७.२७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९५.२५ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी घसरून २४,०८०.४० वर स्थिरावला.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. चंदन तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, ऑरोबिंदो फार्मा आणि ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर्स यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, विजया डायग्नोस्टिक सेंटर, तामिळनाड मर्कंटाइल बँक, ईपीएल आणि सनसेरा इंजिनिअरिंग या पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठीचे गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधरचे शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये लेन्सकार्ट सोल्युशन्स, पिरामल फायनान्स, ब्लू स्टार, टीव्हीएस मोटर कंपनी, सिप्ला, फुजियामा पॉवर सिस्टम्स, ग्रीव्हज कॉटन, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, बीएचईएल आणि सीएएमएस या शेअर्सची शिफारस केली आहे.