शेअर्सने अवघ्या 5 दिवसात दिला 100 टक्के नफा, गाठला 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
मागील पाच दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळत होती. प्रामुख्याने अर्थसंकल्पीय आठवडा असल्याने बाजाराने मोठी गटांगळी खाल्ली होती. मात्र, आज बाजारात सुधारणा पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी या आठवड्याच्या अखेरच्या निशाणीवर खुले झाले. अर्थात आज बाजार सावरल्याने गुंतवणूकदारांचा तब्बल 7 लाख कोटींचा फायदा झाला आहे.
गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स, आज शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत 1184 अंकांनी उसळी घेत, 81,227 अंकांवर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 390 अंकांच्या उसळीसह 24801 अंकांवर व्यवहार करत होता. ज्यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य पसरले आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : देशभरात दारू स्वस्त होणार; वाचा… केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काय केलीये महत्वाची तरतूद!
आयटी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार खरेदी
आज शेअर बाजारात झालेली ही वाढ प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे झाली आहे. याशिवाय आज ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली आहे. इतकेच नाही तर मिडकॅप शेअर्सही तेजीत दिसून आले. तर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक दुपारी 1000 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७ लाख कोटींची वाढ
भारतीय शेअर बाजाराने पुन्हा तेजी पकडल्यानंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ७ लाख कोटींची वाढ झाली आहे. तेजीनंतर मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 456.85 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तर शेवटच्या सत्रात ते 449.82 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात बाजारातील वाढीमुळे मार्केट कॅपमध्ये 7.03 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या १० शेअर्समध्ये जोरदार उसळी
मिडकॅप स्टॉकबद्दल बोलायचे झाल्यास, SJVN चे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक वाढून, 152 रुपयांवर पोहचले. अशोक लेलँडचा शेअर सुमारे 6 टक्क्यांनी वाढून, 246 रुपयांवर पोहोचला. एम पैसाचा शेअर सुमारे 6 टक्के वाढला. स्मॉल कॅपमध्ये, झेनसार टेक्नॉलॉजीचे शेअर्स 5.5 टक्क्यांनी वाढून, 816 रुपये प्रति शेअर झाले. तर इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर जवळपास 4 टक्क्यांनी वाढून, 68 रुपयांवर पोहचला. फाइव्ह स्टार बिझनेस 3.4 टक्क्यांनी वाढून, 749 रुपये झाला. युको बँकेचा शेअर देखील 3 टक्क्यांहून अधिक वाढला. भारती एअरटेलचा सुमारे 4 टक्क्यांनी वाढत, 1504 रुपयांवर पोहचला. टाटा पॉवर 3.5 टक्क्यांनी वाढून, 438 रुपयांवर व्यवहार करत होता. तर डिव्हिस लॅब्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले.