
Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आज अनेक कंपन्यांवर लक्ष असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार वेदांत, इरेडा, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, ट्रेंट, मॅरिको, नारायण हृदयालय, इंडसइंड बँक, जुनिपर हॉटेल्स, झायडस लाइफसायन्सेस या शेअर्सवर त्यांचे अधिक लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णूकांत उपाध्याय आणि चॉईस ब्रोकिंगचे हितेश टेलर यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खालील सहा स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णूकांत उपाध्याय यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये आझाद इंजिनिअरिंग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, आदित्य इन्फोटेक या स्टॉक्सचा समावेश आहे. तर चॉईस ब्रोकिंगचे हितेश टेलर यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये थायरोकेअर टेक्नॉलॉजीज, कार्बोरंडम युनिव्हर्सल आणि मिश्रा धातू निगम (मिधानी) या स्टॉक्सचा समावेश आहे.
Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया आजच्या व्यवहारात गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली. सुमीत बागडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, पूनावाला फिनकॉर्प, ग्रोव , ग्राफाइट इंडिया, उषा मार्टिन या स्टॉक्सचा समावेश आहे. चंदन तापारिया यांनी भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्रीसाठी दोन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचे २७ ऑक्टोबरचे फ्युचर्स शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.