महाराष्ट्र सरकारकडून 754 कोटींच्या कामाची ऑर्डर, 'या' शेअर्सद्वारे वर्षभरात 400 टक्क्यांचा परतावा!
भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून रोज नव्याने विक्रम करताना दिसून येत आहे. अशातच आज शेअर बाजाराने ऐतिहासिक 85,000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी शेअर बाजार सुरु होताना शेअर बाजार काहीसा घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, काही वेळातच बाजाराने सावरत 85,000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. जो दुपारी शेवटचे माहिती हाती येईपर्यंत 85,036.59 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये काहीसे उत्साहाचे पाहायला मिळाले.
घसरणीसह शेअर बाजाराची सुरुवात
मंगळवारी (ता.२४) भारतीय शेअर बाजार खुला झाला तेव्हा 84860.73 अंकांवर व्यवहार करत होता. जो आदल्या दिवशी सोमवारी बाजार बंद होताना, 84928.61 अंकांवर बंद झाला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी 09.51 मिनिटांनी बाजाराने 85,000 अंकांचा आकडा पार केला. त्यानंतर सकाळी 10:51 वाजता सेन्सेक्सने 84,953 अंकांपर्यंत गटागंळी घेतली होती. त्यानंतर दिवसभर मात्र, शेअर बाजाराची वाटचाल ही 85,000 अंकांच्या वरती सुरु होती.
(फोटो सौजन्य – istock)
हे शेअर्स राहिले तेजीत
आज शेअर बाजारात आयटी, पीएसयू बँक, फिन सर्व्हिस, एफएमसीजी आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्स दबावाखाली व्यवहार करत होते. यामध्ये प्रामुख्याने सेन्सेक्स पॅकमध्ये टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, सन फार्मा, भारती एअरटेल, एशियन पेंट्स आणि एनटीपीसी हे शेअर्स आज तेजीसह व्यवहार करताना आढळून आले आहे.
या शेअर्समध्ये झाली घसरण
आज शेअर बाजारात प्रामुख्याने बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, विप्रो आणि बजाज फिनसर्व्ह हे सर्वाधिक घसरले आहेत. याशिवाय आशियायी शेअर बाजारातील बहुतांश बाजार हे सध्या तेजीच्या गतीने व्यवहार करत आहेत. यात प्रामुख्याने टोकियो, शांघाय, हाँगकाँग, बँकॉक, सोल आणि जकार्ता ही सर्वात वेगाने वाढणारा बाजार म्हणून सध्या पाहायला मिळत आहे.
काय आहे अमेरिकेतील स्थिती
सोमवारी अमेरिकन शेअर बाजार हा हिरव्या निशाणीवर बंद झाला. मध्य-पूर्वेतील तणावामुळे बाजारात चिंतेचे वातावरण असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. मात्र, असे असले तरी बाजारातील उच्च मूल्यांकनामुळे गुंतवणूकदारांनी अधिक मुल्य असलेल्या शेअर्सवर नजर ठेवली पाहिजे,असे बाजार अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.