जिल्हाधिकारी पदाला ठोकला रामराम; 'या' व्यवसायाच्या माध्यमातून उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!
सध्याच्या घडीला अनेक जण व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. मात्र, आता एखाद्या व्यक्तीने व्यवसाय धंद्यात आपला ठसा उमटवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी अर्थात आयएएस पदाचा राजीनामा दिल्याचे तुम्हांला सांगितल्यास, तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हे अगदी खरे आहे. डॉ. सैयद सबाहत अजीम असे या व्यावसायिक अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी सुरू केलेल्या छोट्या दवाखान्याच्या आता अनेक जिल्ह्यांमध्ये शाखा पसरल्या आहेत. त्यांनी ग्लोकल हेल्थकेयर सिस्टम्स या नावाने, सुरु केलेल्या व्यवसाय ब्रॅंडचा विस्तार आज कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्सची स्थापना
डॉ. सय्यद सबहत अजीम हे माजी आयएएस अधिकारी आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आयएएसची नोकरी सोडली. त्याच्या वडिलांचा कोलकाता येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. देशभरातील नागरिकांना स्वस्त दरात उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी स्वस्त दरात हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2010 मध्ये, सबाहत अझीम यांनी ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्सची स्थापना केली. ही परवडणाऱ्या रुग्णालयांची साखळी आहे. वैद्यकीय सुविधांअभावी वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी अ्न्य कोणाला असा त्रास होऊ नये, यासाठी या क्षेत्रात उतरण्याच्या निर्णय घेतला.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
वडिलांच्या मृत्यूनंतर उतरलेत वैद्यकीय सुविधांच्या व्यवसायात
डॉ. अजीम यांच्या वडिलांचा कोलकाता येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेने त्यांना आयएएस पद सोडण्याची आणि लोकांना परवडणारी आरोग्य सेवा देण्याची प्रेरणा मिळाली. या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या पदाच्या राजीनाम्यानंतर 2010 मध्ये ग्लोकल हेल्थकेयर सिस्टम्स (जीएचएस) या परवडणाऱ्या रुग्णालयांची साखळी स्थापन केली. वैद्यकीय सुविधांअभावी आपल्या वडिलांचा मृत्यू होऊ शकतो. तर भारतातील कोणत्याही सामान्य नागरिकांसोबत देखील हे घडू शकते. हे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. सय्यद सबहत अजीम यांनी वैद्यकीय सुविधांच्या उभारणीसाठी परवडणाऱ्या रुग्णालयांची साखळी तयार केली.
अनेक जिल्ह्यांमध्ये उभारल्या आहेत शाखा
अझीम यांनी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (JNMC), अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवला. त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेले माणिक सरकारच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकिय सेवेतील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सुविधांच्या उभारणीसाठी आपल्या गावात 30 खाटांचे छोटेसे आरोग्य केंद्र बांधून सुरुवात केली. पण, लवकरच त्याच्या उद्योगाचा विस्तार केला. आता त्यांची रुग्णालयाची साखळी पश्चिम बंगालमधील बीरभूम, बांकुरा, मुर्शिदाबाद, वर्धमान, दार्जिलिंग आणि नादिया अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या व्यवसायाचे साम्राज्य आज तब्बल करोडोंच्या घरात पोहोचले आहे.
डॉ. अझीम यांनी ग्रामीण भारतात परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने अनेक लोकांच्या जीवन वाचण्यास मदत झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांसाठी, त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या श्वाब फाउंडेशन फॉर सोशल एंटरप्राइझने वर्ष 2020 चे सामाजिक उद्योजक म्हणून निवडले आहे.