विप्रोचे शेअर्स एका झटक्यात 50 टक्क्यांनी कोसळले; तुम्ही तर घेतला नाहीये ना? वाचा... नेमकं काय घडलं?
तुम्ही विप्रोचे शेअर होल्डर असाल तर तुमची काळजी वाढवणारी बातमी आहे. आज विप्रोच्या शेअरधारकांनी त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर टाकताच त्यांचा पोर्टफोलिओ एका दिवसात निम्मा झाला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराकडे विप्रोचे 50 हजार रुपयांचे शेअर्स होते. ते 25 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे.
2 डिसेंबरला बाजार बंद झाला तेव्हा विप्रोचे शेअर्स 585 रुपये प्रति शेअर होते, जे आज 291.80 रुपये प्रति शेअरवर पोहोचले आहेत. आज म्हणजे 3 डिसेंबरला विप्रोच्या स्टॉक बोनस इश्यूची एक्स-डेट होती, त्यामुळे विप्रोचे शेअर्स आज निम्मे झाले आहे.
नेमकं काय घडलंय?
स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी बोनस इश्यू एक्स-डेट टर्म वापरते. ज्यामध्ये कंपनी तिच्या शेअरधारकांना बोनस इक्विटी शेअर्स जारी करणारी तारीख निश्चित करते. ज्यामध्ये सध्याच्या शेअरची किंमत निम्मी केली जाते आणि तुमच्याकडे आधीपासून असलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट होते. यामुळे तुमच्या पोर्टफोलिओची किंमत एक-दोन दिवसांसाठी निम्मी होते. ती अपडेट होताच तुमच्या पोर्टफोलिओची किंमत पुन्हा बदलते.
1:1 मध्ये बोनस शेअर्स जारी केले जाणार
यावेळी विप्रोने 1:1 मध्ये बोनस शेअर्स जारी केले आहेत, ज्यामध्ये जर एखाद्या शेअर होल्डरचे 10 शेअर्स असतील तर त्याची संख्या वीसपर्यंत वाढेल. यापूर्वी, कंपनीने 2019 मध्ये बोनस शेअर्स दिले होते. ज्यामध्ये 1 शेअर ऐवजी 3 शेअर्स देण्यात आले होते. तर 2017 मध्ये एका शेअरसाठी एक शेअर देण्यात आला होता. तसेच 2010 मध्ये 2 शेअर्स ऐवजी 3 शेअर्स देण्यात आले.
इक्विटी बोनस इश्यूनंतर, तुमचा पोर्टफोलिओ निम्मा झाला असेल, पण एक-दोन दिवसांत तो पूर्वीप्रमाणेच पूर्ववत होईल. तसेच, आता तुमच्याकडे पूर्वीपेक्षा दुप्पट विप्रो शेअर्स असतील.
काय करते ही कंपनी?
विप्रो टेक्नॉलॉजीज ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ची कंपनी आहे. सिक्स्-सिग्मा, एस.इ.आय.-सी.एम.एम., बी.एस.-१५००० ही गुणवत्तेची विविध आंतरराष्ट्रीय मानांकने विप्रोच्या विकसन केंद्रांना प्रदान करण्यात आली आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)