
2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI ( सौजन्य - सोशल मीडिया )
2 ऑक्टोबरला कोणत्याही दुकानात UPI पेमेंट स्विकारलं जाणार नाही. लोकांना फक्त रोकड किंवा कार्डचा वापर करता येणार आहे. याच्या माध्यामातूनच तुम्ही कोणतीही खरेदी करु शकता.
व्यापारी UPI पेमेंटवरील 0.4 % मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच MDR शुल्काविरोधात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन यासाठी केलं जातंय की पेट्रोल, डिझेल, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स आणि धान्यावरील नफा आधीच खूप कमी मिळतो. या नवीन कर प्रणालीमुळे आर्थिक भार आणखीनच वाढणार आहे. इंदर रिटेल गारमेंट्स असोसिएशनने आधीच इशारा दिला आहे की जर १५ ऑक्टोबरपूर्वी हा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर युपीआय क्यूआर कोड मशीन थेट पाण्यात फेकून देतील.
सरकारच्या MDR संबंधित घेतलेल्या या निर्णयामुळे व्यावसायिक बरेच संतप्त झाले आहेत. २३ सप्टेंबर रोजी भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरसारख्या मध्य प्रदेशातील शहरांमधील जवळपास १२५ व्यावसायिक संघटनांनी ‘नो यूपीआय डे’ पाळला आहे. याचा राज्यभरातील सुमारे २५% व्यवसायावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स MACCIA आणि पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनदेखील या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला आहे.
Mumbai, Maharashtra: President, MACCIA, Ravindra Mangave says, “The MDR charge imposed on UPI is an issue of concern. Because of UPI, the country has adopted a digital payment system, and UPI is our country’s digital pride. However, in protest against the MDR being imposed on… pic.twitter.com/XygLqEAKYI — IANS (@ians_india) September 23, 2026
एका वृत्तानुसार, MACCIA चे अध्यक्ष रवींद्र मांगवे यांनी सांगितले की, २ ऑक्टोबर हा ‘नो यूपीआय दिन’ म्हणून पाळला जाईल. ते म्हणाले, “आम्ही देशभरातील सर्व व्यापारी संघटनांशी बोललो आहोत आणि केवळ महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यांनीही ‘नो यूपीआय दिन’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यांनी असेही सांगितले की, मॅक्सिया आणि तिच्याशी संलग्न ५०० संघटना आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची योजना आखत आहेत.
मांगवे पुढे म्हणाले की, “फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन FRTWA, ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन AICPDF, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन AIMRA, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशन AIJGF आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशन AIEOTF या देशातील काही महत्त्वाच्या संघटना आहेत, ज्या २ ऑक्टोबर रोजीच्या ‘नो यूपीआय दिना’ला पाठिंबा देतील.”
MDR हे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे प्रक्रिया चार्जेस आहेत. जेव्हा तुम्ही दुकानात क्यूआर कोड स्कॅन करून किंवा कार्ड स्वाइप करून पेमेंट करता, तेव्हा ग्राहकाच्या बँक खात्यातून दुकानदाराच्या खात्यात पैसे पाठवले जातात. ही एक संपूर्ण डिजिटल नेटवर्क कार्यरत असते. या डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि सुरक्षेच्या देखभालीसाठी येणाऱ्या खर्चाला MDR म्हणतात.
सरकारच्या नवीन निर्णयानुसार, १५ ऑक्टोबरपासून, ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या पीअर-टू-मर्चंट P2M यूपीआय व्यवहारांवर ०.४०% शुल्क आकारले जाईल, ज्याची कमाल मर्यादा ₹३०० असेल. याचा अर्थ असा की, व्यवहार ₹१ लाख असो वा ₹१० लाख, व्यापाऱ्यांना ₹३०० पेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. कराची रक्कम केवळ ₹३०० वर गोठवली जाईल.