सौरव गांगुलीने Myntra सोबत लाँच केला स्वतःचा ‘हा’ ब्रँड (Photo Credit- X)
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आता ‘बिझनेसच्या पिच’वरही फलंदाजी करताना दिसणार आहे. ज्याप्रमाणे त्याने आपल्या निडर नेतृत्वाने भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली, त्याचप्रमाणे गांगुली आता देशाच्या वेगाने वाढणाऱ्या एथनिक वेअर मार्केटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी त्याने प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Myntra सोबत भागीदारी करून ‘सौरग्य’ (Sauragya) हा स्वतःचा फॅशन ब्रँड लाँच केला आहे.
लाँच इव्हेंटमध्ये गांगुलीने सांगितले की, “आम्ही फक्त पारंपरिक कपड्यांपुरते मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात आणखी स्टायलिश फॅशन घेऊन येऊ. हा केवळ पैसे कमावण्याचा प्रोजेक्ट नाही, तर काहीतरी खास आणि अर्थपूर्ण करण्याची ही आमची एक सकारात्मक सुरुवात आहे.”
Former India captain @SGanguly99 walks the ramp during the launch of his ethnic wear brand “Souragya” in the city on Monday. pic.twitter.com/qZ7KqWsY81
— RevSportz Global (@RevSportzGlobal) September 15, 2025
‘सौरग्य’ या ब्रँडमध्ये गांगुलीचे भारतीय संस्कृतीवरील प्रेम आणि तिला आधुनिक फॅशनसोबत जोडण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. हा ब्रँड पारंपरिक डिझाइन्सना आजच्या काळानुसार डिझाइन करून भारतीय हस्तकलेचा सन्मान करतो. गांगुलीने सांगितले की, Myntra च्या डिझाइन कौशल्यामुळे त्यांची ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यास मोठी मदत झाली. “आमचा उद्देश असे कपडे तयार करण्याचा आहे, जे कालातीत, सोफिस्टिकेटेड आणि वर्साटाईल असतील. जेणेकरून लोकांना ते आवडतील आणि ते त्यांच्या स्टाईलमध्ये सहज समाविष्ट करता येतील,” असेही गांगुली म्हणाले.
#WATCH | Kolkata: On Indian cricketers refusing to shake hands with Pakistani cricketers during yesterday’s match, former Captain of the Indian Cricket Team Sourav Ganguly says, “The team did what it thought. Terrorism should not happen. Be it India, Pakistan, Russia, Ukraine,… pic.twitter.com/VJ4779ahJI
— ANI (@ANI) September 15, 2025
Sourav Ganguly: दादाची टीम! सौरव गांगुली पहिल्यांदाच बनले हेड कोच, ‘या’ संघाची घेतली सूत्रे!
हा ब्रँड विशेषतः पश्चिम बंगालच्या अस्सल डिझाइन्सना राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न आहे. ‘सौरग्य’ चा पहिला कलेक्शन बंगालच्या कला आणि संस्कृतीला आदरांजली वाहतो. यामध्ये प्रीमियम फॅब्रिक्स, आकर्षक कलाकुसर आणि आधुनिक टेलरिंगचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे पारंपरिक भारतीय कपड्यांना नवा लूक मिळाला आहे. हा ब्रँड सुरुवातीला 100 स्टाइल्ससह लाँच करण्यात आला असून, लवकरच त्याचा विस्तार केला जाईल.
भारतातील अपॅरल मार्केट वेगाने बदलत असून, लोक आता ब्रँडेड कपड्यांकडे अधिक आकर्षित होत आहेत. 2022 मध्ये या मार्केटचे मूल्य 120.8 बिलियन यूएस डॉलर होते आणि 2023 पर्यंत ते 146.3 बिलियनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषतः एथनिक वेअर मार्केटमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. 2024 मध्ये या मार्केटचे मूल्य 197.2 बिलियन यूएस डॉलर असून, 2023 पर्यंत ते 558.5 बिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सण, समारंभ, विवाहसोहळे, वाढते उत्पन्न आणि बॉलिवूडचा प्रभाव यामुळे ही वाढ होत आहे.