Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 79,486, निफ्टी 24,148 वर बंद, वाचा… कोणते शेअर्स घसरले!

आज भारतीय शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 55.47 अंकांच्या घसरणीसह 79,486.32 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 51.15 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 24,148.20 वर बंद झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 08, 2024 | 05:17 PM
सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!

सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!

Follow Us
Close
Follow Us:

चालू आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी खुपच निराशाजनक ठरला आहे. मात्र, सध्याच्या घडीला अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गेले दोन दिवस चांगले तेजीचे ठरले. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर, गेल्या 2 दिवसांत भारतीय शेअर बाजारात तेजी आली होती. जी फार काळ टिकली नाही. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस केवळ घसरणीची लाल चिन्हे शेअर बाजारावर वर्चस्व गाजवताना दिसून आला आहे.

आज भारतीय शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 55.47 अंकांच्या घसरणीसह 79,486.32 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 51.15 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 24,148.20 वर बंद झाला आहे. याशिवाय बँक निफ्टी 355 अंकांच्या किंवा 0.68 टक्क्यांच्या घसरणीसह 51,561 च्या पातळीवर बंद झाला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आज काहीशी निराशा दिसून आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – ना मुकेश अंबानी, ना गौतम अदानी; अझीम प्रेमजी देखील नाही; हे आहे भारतातील सर्वाधिक दानशूर उद्योगपती!

शुक्रवारी (ता.८) एफएमसीजी, आयटी, फार्मा, हेल्थकेअर इंडेक्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील मजबूतीच्या हिरव्या चिन्हांसह व्यापार बंद झाला आहे. आज शेअर बाजारात घसरणाऱ्या क्षेत्रांमध्ये, रियल्टी इंडेक्समध्ये 2.90 टक्के कमालीची घसरण दिसून आली आहे. त्यासोबत मीडिया इंडेक्स 2.09 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, तेल आणि वायू शेअर्सचा व्यवहार 1.96 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

कशी राहिली सेन्सेक्स, निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर घसरणीसह बंद झाले आहे. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये आज एम अँड एम, टायटन, टेक महिंद्रा, नेस्ले आणि इन्फोसिसचे शेअर्स वधारलेले दिसून आले. याउलट आज मुंबई शेअर बाजारात घसरलेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, टाटा स्टील, एसबीआय, टाटा मोटर्स आणि रिलायन्सचे शेअर लाल चिन्हासह बंद झालेले दिसून आले.

हे देखील वाचा – पुढील आठवड्यात खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ; 13 नोव्हेंबरपासून पैसे गुंतवता येणार!

याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) 50 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह बंद झाले आहे. तर 27 शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. एका शेअर्सने कोणताही बदल न करता, आज व्यवहार बंद केला आहे. निफ्टीमध्ये, महिंन्द्रा&महिंन्द्रा, टायटन, टेक महिंद्रा, नेस्ले आणि इन्फोसिसच्या समभागांनी वाढ नोंदवली. तर ट्रेंट, कोल इंडिया, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि एसबीआयच्या समभागांच्या घसरणीसह व्यापार बंद झाला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock market closes with decline sensex closes at 79486 nifty at 24148

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या
1

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

ज्वेलरी, बार की ETF? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम पर्याय
2

ज्वेलरी, बार की ETF? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम पर्याय

OpenAi बनले जगातील सर्वात मोठे स्टार्टअप, कंपनीचे मूल्यांकन पोहोचले 500 अब्ज डॉलर्सपर्यंत
3

OpenAi बनले जगातील सर्वात मोठे स्टार्टअप, कंपनीचे मूल्यांकन पोहोचले 500 अब्ज डॉलर्सपर्यंत

TCS ने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, NITES ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला ‘हा’ दावा
4

TCS ने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, NITES ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला ‘हा’ दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.