
Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! या शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स १२.९९ अंकांनी, म्हणजेच ०.०२ टक्क्यांनी घसरून ७६,९४४.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २४.६० अंकांनी, म्हणजेच ०.१० टक्क्यांनी घसरून २४,०५५.८० वर स्थिरावला. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये म्फासिस, जिंदाल स्टेनलेस आणि रेन इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रीन एनर्जी, टाटा मोटर्स, विप्रो, ग्लँड फार्मा, एनएमडीसी, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग, एल अँड टी फायनान्स, वेल्सपन कॉर्प या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्हज व क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी येत्या काळात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी बजाज ऑटो फ्युचर्स, इन्फो एज फ्युचर्स आणि ऑरोबिंदो फार्मा फ्युचर्सची शिफारस केली आहे.