
Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आज पेटीएम, मॅनकाइंड फार्मा, टाटा कंझ्युमर, आयटीसी हॉटेल्स, एथर एनर्जी, नझारा टेक्नॉलॉजीज, आरईसी, इन्फोसिस, कोटक महिंद्रा, येस बँक, बीपीसीएल, कोफोर्ज, टॉरेंट फार्मा, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट, नेटवेब टेक्नॉलॉजीज, बँक ऑफ इंडिया या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. आज इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एथर एनर्जी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, आयटीसी हॉटेल्स, दालमिया भारत, बँक ऑफ महाराष्ट्र, दालमिया भारत, एपीएल अपोलो ट्यूब्स इत्यादी कंपन्या चर्चेत असणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार इटरनल , बँक ऑफ बडोदा आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस हे तीन शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली. ज्यामध्ये निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी, जीएमआर एअरपोर्ट्स आणि रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया यांचा समावेश आहे.