Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

SEBI Strict Action Against Avadhut Sathe : शेअर बाजारात ट्रेडिंग शिकवून अल्पावधीत अफाट कमाईचे दावे करणाऱ्या प्रसिद्ध 'ट्रेडिंग गुरु' अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीवर भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने मोठी कारवाई केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 24, 2026 | 03:01 PM
Avadhut Sathe यांना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश ( सौजन्य - सोशल मीडिया )

Avadhut Sathe यांना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Trading च्या नावाखाली फसवणूक?
  • विना नोंदणी चालवत होते क्लास
  • Avadhut Sathe यांना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश
SEBI Strict Action Against Avadhut Sathe : अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच ASTPL आणि तिचे संस्थापक अवधूत साठे यांच्या विरोधात मोठी कारवाई केली गेली आहे. ट्रेडिंगच्या नावाखाली हजारो नवशिक्यांची फसवणूक केल्याचे आरोप आणि विना नोंदणी क्लास चालवत असल्याचने साठेना मोठ्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. गुंतवणूकदार आणि सहभागींकडून गोळा केलेले 546.17 कोटी रुपये परत करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीने ही मोठी कारवाई केली. सेबीला नेमकं काय आढळून आलं? काय आहे नेमकं प्रकरण ? सविस्तर जाणून घेऊयात. ( SEBI Strict Action Against Avadhut Sathe ) 

Bank Of India च्या भागधारकांची चांदी! दुसऱ्या तिमाहीत बँकेने कमावला तब्बल 3202 कोटींचा निव्वळ नफा; पाहा कशी राहीली कामगिरी

सेबीला असे आढळून आले की, कंपनी आणि तिचे संस्थापक आवश्यक नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक म्हणून कार्यरत करत होते. सेबीने अंतिम आदेशात अवधूत साठे आणि त्यांच्या कंपनीवर दोन वर्षांसाठी किंवा पैसे परत करण्याच्या निर्देशांचं पालन होईपर्यंत जो कालावधी जास्त आहे त्या काळापर्यंत बाजारातून संपूर्ण बंदी घातली आहे. कंपनीचे संचालक, अवधूत साठे यांना तर सहा महिन्यांसाठी बाजारापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रक्कम ५ महिन्याच्या आत जमा होणं आवश्यक

सेबीने कंपनी आणि अवधूत साठे यांना आदेश दिल्यापासून पुढील पाच महिन्यांच्या आत ₹५४६.१७ कोटींची ही संपूर्ण रक्कम एका निर्दिष्ट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्याक आले आहेत. तसेच, त्यांनी ३० दिवसांच्या आत इंग्रजी, हिंदी आणि मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणाऱ्या स्थानिक भाषेतील वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करून गुंतवणूकदारांना परतावा प्रक्रियेबद्दल माहिती देणं देखील आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गुंतवणूकदारांना रिटर्न फक्त इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारा

नियामकाने स्पष्ट केले आहे की, पेमेंटची संपूर्ण नोंद आणि लाभार्थ्यांची ओळख ठरणवण्यासाठी, गुंतवणूकदारांना परतावा केवळ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर किंवा इतर बँकिंग चॅनेलद्वारेच दिला जाईल. सर्व दावेदारांना पैसे दिल्यानंतर काही निधी शिल्लक राहिल्यास, तो सेबीकडे सुपूर्द केला जाईल. ही रक्कम एका वर्षासाठी एस्क्रो खात्यात ठेवली जाईल, जेणेकरून पात्र गुंतवणूकदार आणि तक्रारदारांना त्यांचे पैसे दिले जाऊ शकतील. या कालावधीनंतरही काही निधी शिल्लक राहिल्यास, तो गुंतवणूकदार संरक्षण आणि शिक्षण निधी म्हणजेच IPEF मध्ये हस्तांतरित केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अवधूत आणि गौरी साठेंवर ११.५ कोटी रुपयांचा दंड

सेबीने कंपनी, अवधूत साठे आणि गौरी साठे यांच्यावर एकूण ११.५ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. यामध्ये कंपनीवर ६ कोटी रुपये, अवधूत साठे यांच्यावर ४ कोटी रुपये आणि गौरी साठे यांच्यावर १.५ कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. ही रक्कम आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक असल्याचं सेबीने स्पष्ट केलं आहे. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जोपर्यंत संपूर्ण रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत संबंधित पक्षांच्या बँक खात्यांमधील डेबिट व्यवहार गोठवलेलेच राहतील.

सेबीच्या तपासात असे आढळून आले की, ASTPL आणि तिचे संस्थापक केवळ शेअर बाजाराचे शिक्षण देण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते गुंतवणूकदारांना विशिष्ट शेअर्सच्या खरेदी-विक्रीबाबतही सल्ला देत होते. या तपासात असे उघड झाले की, आवश्यक नियामक नोंदणी नसतानाही, ही कंपनी कथितरित्या एंट्री आणि एक्झिट लेव्हल्स, स्टॉप लॉस आणि शेअरच्या किमतीच्या दिशेबाबत सल्ला देत होती.

Crude Oil Price Hike : सोमवारी Share Market मध्ये हाहाःकार माजणार… कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या! आकडा थेट 117 डॉलर पार

💡

Frequently Asked Questions

  • Que: सेबीने अवधूत साठे यांच्यावर कोणती मुख्य कारवाई केली आहे?

    Ans: सेबीने अवधूत साठे आणि त्यांच्या संस्थेला बेकायदेशीर सल्लागाराच्या माध्यमातून वसूल केलेले ₹५४६ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • Que: अवधूत साठे यांच्यावर सेबीने कारवाई करण्याचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: सेबीच्या नियमांनुसार वित्तीय सल्ला किंवा ट्रेडिंग टिप्स देण्यासाठी आवश्यक असणारी अधिकृत नोंदणी न करता, मोठे परतावे मिळवून देण्याचे दावे करून ट्रेडिंग क्लासेस चालवणे आणि अनधिकृत सल्ला देणे, हे मुख्य कारण आहे.

  • Que: सेबीच्या नियमांनुसार वित्तीय सल्ला किंवा ट्रेडिंग टिप्स देण्यासाठी आवश्यक असणारी अधिकृत नोंदणी न करता, मोठे परतावे मिळवून देण्याचे दावे करून ट्रेडिंग क्लासेस चालवणे आणि अनधिकृत सल्ला देणे, हे मुख्य कारण आहे.

    Ans: गुंतवणूकदारांनी केवळ SEBI Registered संशोधन विश्लेषक किंवा गुंतवणूक सल्लागारांचीच मदत घ्यावी आणि रातोरात श्रीमंत होण्याचे दावे करणाऱ्या अनधिकृत संस्थांपासून सावध राहावे.

Web Title: Sebi cracks down on avadhut sathe orders 546 crore refund marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Business News
  • Investments
  • sebi
  • share market

संबंधित बातम्या

Crude Oil Price Hike : सोमवारी Share Market मध्ये हाहाःकार माजणार… कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या! आकडा थेट 117 डॉलर पार
1

Crude Oil Price Hike : सोमवारी Share Market मध्ये हाहाःकार माजणार… कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या! आकडा थेट 117 डॉलर पार

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच
2

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास
4

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.