Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत टाटा मोटर्ससह 'या' शेअर्सवर असेल नजर
शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराच्या तीन सत्रांच्या तेजीला ब्रेक लागला. किरकोळ महागाईत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाल्याने आणि त्यामुळे पुढील महिन्यात आरबीआयच्या संभाव्य व्याजदर वाढीबद्दल चिंता वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह बंद झाले. ३०-शेअर सेन्सेक्स ३१८.५६ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी घसरून ८१,५९२.४५ वर बंद झाला. सत्रादरम्यान निर्देशांकावर मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव होता, ज्यामुळे तो ६२२.२६ अंकांनी, म्हणजेच ०.७५ टक्क्यांनी घसरून ८१,२८८.७५ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला होता. निफ्टी ५० मध्येही १५५.०५ अंकांची, म्हणजेच ०.६१ टक्क्यांची घसरण होऊन तो २५,१४४.३० वर स्थिरावला. शुक्रवारच्या नुकसानीमुळे या महिन्यात आतापर्यंत दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये पहिली लक्षणीय घसरण झाली. (फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, गोदरेज इंडस्ट्रीज, हीरो मोटर्स, झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस, हिंडाल्को इंडस्ट्रीज, रेडिंग्टन इंडिया, फ्यूजन सीएक्स, फिजिक्सवाला, अर्बन कंपनी, एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग स्टॉक्स, या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एमसीएक्स, बीएसई आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.
आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांना रेडिंग्टन, अॅस्टर डीएम, आणि कॅनरा बँक हे तीन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी लॉयड्स इंजिनिअरिंग, निवा बुपा, वेदांता पॉवर या तीन शेअर्सची निवड केली आहे.






