छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम सातारा तालुक्यातील अंबवडे गावात गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावात दरवर्षी गड-किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत गावातील प्रत्येक युवक, मंडळ आणि नागरिक उत्साहाने सहभागी होतात. विशेष म्हणजे दरवर्षी गावात तब्बल पन्नासहून अधिक गड-किल्ल्यांची निर्मिती केली जाते. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मंडळाकडून वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारली जाते. कोणताही किल्ला दुसऱ्यांदा बनवला जात नाही. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला जातो.
दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापासून हे गड-किल्ले पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह परिसरातील शिवभक्त आणि पर्यटक अंबवडे गावात दाखल होऊ लागतात. या काळात गावाला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. गावातील तरुणाईने एकत्र येत जपलेली ही परंपरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाप्रती असलेली निष्ठा आणि पुढच्या पिढीमध्ये शिवइतिहासाची आवड निर्माण करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. गड-किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहास जपणारं अंबवडे गाव… शिवभक्तांसाठी ठरतंय आकर्षणाचं केंद्र याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी