Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Payments Bank Limited: RBI ची कडक कारवाई! एअरटेल पेमेंट्स बँकेवर ठोठावला ३१.८० लाखांचा दंड 

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत काही तरतुदींचे पालन न केल्याने बँकेवर ३१.८० लाखांचा दंड  ठोठावला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 31, 2026 | 09:39 AM
Airtel Payments Bank Limited: RBI ची कडक कारवाई! एअरटेल पेमेंट्स बँकेवर ठोठावला ३१.८० लाखांचा दंड 

Airtel Payments Bank Limited: RBI ची कडक कारवाई! एअरटेल पेमेंट्स बँकेवर ठोठावला ३१.८० लाखांचा दंड 

Follow Us
Close
Follow Us:
  • एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड बँक अडचणीत
  • आरबीआयकडून एअरटेल पेमेंट्स बँकेवर कारवाई
  • बँकेवर ३१.८० लाख रुपयांचा दंड ठोठावला
 

Airtel Payments Bank Limited: सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल, मध्यवर्ती बँकेने या पेमेंट्स बँकेवर ३१.८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७A(1)(c) आणि कलम ४६(4)(i) च्या तरतुदींनुसार RBI ला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड आकारण्यात आला आहे.

३१ मार्च २०२५ च्या आर्थिक स्थितीच्या आधारे, RBI द्वारे बँकेची तपासणी आणि पर्यवेक्षकीय मूल्यमापन’ (ISE 2025) करण्यात आले होते. तपासणी करत असताना मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले की, आर्थिक व्यवहाराच्या बाबतच्या निर्देशांमधील काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे, RBI ने एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडवर ३१.८० लाख रुपयांचा दंड लावला आहे.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढउतार सुरूच… तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर? जाणून घ्या

RBI च्या निर्देशांचे पालन न केल्याबाबतच्या निष्कर्षांवर आणि या संदर्भातील संबंधित पत्रव्यवहारावर आधारित, बँकेला एक नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसद्वारे बँकेला कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती; म्हणजेच, RBI च्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँकेवर दंड का आकारला जाऊ नये, याचे स्पष्टीकरण बँकेकडे मागवण्यात आले होते. RBI ने नमूद केले की, बँकेने नोटीसवर दिलेल्या उत्तराचा, सादर केलेल्या अतिरिक्त स्पष्टीकरणांचा आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान मांडलेल्या तोंडी युक्तिवादांचा विचार केल्यानंतर, बँकेवर लावलेला आरोप सत्य असल्याचे RBI ला आढळून आले. त्यामुळे, बँकेवर दंड आकारणे ही योग्य कारवाई असल्याचे निश्चित झाले.

हे देखील वाचा: गुंतवणूकदारांची मौज! Share Market मध्ये कमाईची बंपर संधी, कंपन्या ‘बोनस’ जाहीर करण्याच्या तयारीत

ही कारवाई नियमातील त्रुटींवर आधारित आहे आणि बँकेने आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराची वैधता ठरवण्याचा यामागे कोणताही उद्देश नाही. मध्यवर्ती बँकेने पुढे असेही स्पष्ट केले की, हा आर्थिक दंड आकारल्यामुळे, RBI बँकेविरुद्ध भविष्यात हाती घेऊ शकणाऱ्या इतर कोणत्याही कारवाईवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही.

एअरटेल पेमेंट्स बँक ही एक भारतीय पेमेंट्स बँक असून, तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ही बँक ‘भारती एअरटेल’ची एक उपकंपनी असून५ जानेवारी २०२२ रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तिला ‘RBI कायदा, १९३४’ च्या दुसऱ्या अनुसूची अंतर्गत ‘अनुसूचित बँक’ दर्जा प्रदान केला.

Web Title: Strict action by the rbi fine of 3180 lakhs imposed on airtel payments bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • airtel
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकणार? RBI च्या इशाऱ्यानंतर 48 तासांत झाले 3 मोठे निर्णय
1

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकणार? RBI च्या इशाऱ्यानंतर 48 तासांत झाले 3 मोठे निर्णय

Dollar च्या तुलनेत रुपया शंभरीच्या उंबरठ्यावर, RBI मार्कटच्या भरोश्यावर? आता काय होणार?
2

Dollar च्या तुलनेत रुपया शंभरीच्या उंबरठ्यावर, RBI मार्कटच्या भरोश्यावर? आता काय होणार?

Indian Economy: किचनचे बजेट कोलमडले! किरकोळ महागाई ३.४८ टक्क्यांवर; सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री
3

Indian Economy: किचनचे बजेट कोलमडले! किरकोळ महागाई ३.४८ टक्क्यांवर; सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री

Home Loan Update: घराचं स्वप्न होणार साकार! होम लोनचे व्याजदर घटवले; कोणत्या बँकेत मिळेल सर्वात स्वस्त कर्ज?
4

Home Loan Update: घराचं स्वप्न होणार साकार! होम लोनचे व्याजदर घटवले; कोणत्या बँकेत मिळेल सर्वात स्वस्त कर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.