Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१ लाखांच्या गुंतवणुकीतून उभा केला व्यवसाय; आता महिन्याचा टर्नओवर आहे लाखांच्या घरात

चेन्नईतील ६९ वर्षीय विद्याधरन नारायणन यांनी १ लाख रुपयांत मायक्रोग्रीन्स शेती सुरू करून आज महिन्याला १ लाख रुपयांचा टर्नओव्हर मिळवला असून, ६०,००० रुपयांहून अधिक नफा कमावत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 29, 2025 | 06:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

चेन्नईतील ६९ वर्षीय विद्याधरन नारायणन हे एक शहरी शेतकरी आहेत. त्यांनी अवघ्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी ऑर्गेनिक मायक्रोग्रीन्स उगवण्याच्या युनिटची स्थापना केली आणि ३०० चौरस फूट जागेत शेती सुरू केली. आज त्यांच्या व्यवसायाचा मासिक टर्नओव्हर सुमारे १ लाख रुपयांच्या घरात आहे, ज्यातून त्यांना दरमहा ६०,००० रुपयांहून अधिक नफा मिळतो. विद्याधरन यांनी सामाजिक क्षेत्रात ३० वर्षे काम केल्यानंतर २०१४ मध्ये मायक्रोग्रीन्स शेतीला सुरुवात केली. त्यांनी अल्प गुंतवणुकीत टिकाऊ आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी मायक्रोग्रीन्सची निवड केली. मायक्रोग्रीन्स हे लहान रोपे असतात, जे फक्त ७ ते ९ दिवसांत वाढतात आणि तोडणीसाठी तयार होतात. पोषणमूल्यांनी समृद्ध आणि उत्तम चव असलेली ही रोपे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

बुटांच्या कारखान्यात केले काम, पत्नीचे दागिने ठेवले गहाण… आज आहेत अब्जोपतींचे मालक

विद्याधरन यांच्या यशस्वीतेमुळे मायक्रोग्रीन्स शेती हा कमी जागा आणि अल्प गुंतवणुकीत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यांनी आपल्या घरातील २५ चौरस फूट जागेत सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मोहरी, मेथी आणि ब्रोकलीसारख्या लोकप्रिय प्रकारांवर प्रयोग केले आणि त्यांना स्थानिक बाजारपेठेत विकले. २०१७ पर्यंत त्यांनी आपले उत्पादन वाढवत घरातील १०० चौरस फूट जागेत शेती केली. पुढे, १ लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात त्यांनी ३०० चौरस फूट ग्रीन नेट शेड उभारले, ज्यामध्ये नैसर्गिक हवेच्या प्रवाहाचा उपयोग करून योग्य वातावरण राखले जाते. त्यामुळे विजेचा खर्चही कमी होतो.

विद्याधरन आपल्या शेतीसाठी वर्मीकंपोस्टचा वापर करतात. ते मुळा, बीट, कोबी, फ्लॉवर आणि ग्रीन टीच्या चार प्रकारांसह विविध मायक्रोग्रीन्स उगवतात. ते आठवड्याला सुमारे १५ किलो (महिन्याला ६० किलो) मायक्रोग्रीन्स विकतात. त्यांची किंमत १२०० ते ३००० रुपये प्रति किलोपर्यंत असते, जी प्रकारानुसार बदलते.

Todays Gold-Silver Price: ग्राहकांच्या खिशाल कात्री! सोन्याच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण

त्यांचे मुख्य ग्राहक स्थानिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. मायक्रोग्रीन्सचा वापर सॅलड, सॅंडविच आणि विविध पदार्थांमध्ये केला जातो. मायक्रोग्रीन्स शेतीमुळे कमी जागेत, कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळू शकतो, हे विद्याधरन यांच्या यशाने सिद्ध केले आहे.

Web Title: Success story of vidyadharan narayanan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • Agriculture Success Story

संबंधित बातम्या

‘ज्याला आपण कचरा समजतो, त्यातून तिने वैभव उभे केले’ अशिता सिंघलची संघर्षगाथा
1

‘ज्याला आपण कचरा समजतो, त्यातून तिने वैभव उभे केले’ अशिता सिंघलची संघर्षगाथा

बेकरीत काउंटर बॉय म्हणून काम करणारा मुलगा बनला कोट्यवधींचा मालक! ब्रँड “९९ पॅनकेक्स”
2

बेकरीत काउंटर बॉय म्हणून काम करणारा मुलगा बनला कोट्यवधींचा मालक! ब्रँड “९९ पॅनकेक्स”

८००० रुपयांपासून घडवले कोटींचे साम्राज्य! “समस्या, समाधान आणि यश…”
3

८००० रुपयांपासून घडवले कोटींचे साम्राज्य! “समस्या, समाधान आणि यश…”

आयटी नोकरी सोडून जैविक शेतीचा मार्ग; ‘श्रेष्ठ’ ऑर्गेनिक स्टोअरमधून आरोग्यदायी अन्नाचा प्रसार
4

आयटी नोकरी सोडून जैविक शेतीचा मार्ग; ‘श्रेष्ठ’ ऑर्गेनिक स्टोअरमधून आरोग्यदायी अन्नाचा प्रसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.