Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

UPI Payment Supreme Court Order : डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या UPI व्यवहारांवरील ०.४% MDR शुल्काला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे १५ ऑक्टोबरपासून व्यापारी आणि दुकानदारांकडून युपीआय व्यवहारांवर ठराविक टक्केवारीनुसार शुल्क वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 28, 2026 | 05:12 PM
ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
  • Supreme Court चा निकाल
  • ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
UPI Payment Supreme Court Order : UPI पेमेंटवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR लागू होणार या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात वातावरण तापले आहे. केंद्र सरकार लागू करणाऱ्याया MDR वर सर्वाच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आलं आहे. वृत्तानुसार सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी RBI आणि NPCI यांना नोटीस बजावली आहे. पण या सगळ्यात मात्र नवीन MDR रचनेला तात्काळ स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. याचा अर्थ 15 ऑक्टोबरपासून लागू होणारा हा नवीन नियम ठरल्याप्रमाणेच त्याच तारखेपासून पुढे लागू होणार आहे. पण याचा भार नेमका कोणावर पडणार? असा प्रश्न तुम्हालाही निर्माण झाला आहे का? ( UPI Payment Supreme Court Order ) 

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?

नवीन नियमानुसार, ‘निवडक व्यक्ती-ते-व्यापारी UPI पेमेंटवर ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी 0.4% MDR आकारला जाईल. ₹75,000 किंवा त्याहून अधिक रकमेच्या पेमेंटसाठी, हे शुल्क जास्तीत जास्त ₹300 इतकं असेल. महत्त्वाचे म्हणजे, हे शुल्क ग्राहकाकडून स्वतंत्रपणे वसूल केले जाणार नाही. MDR साठी व्यापारी जबाबदार असणार आहेत’.

₹2,000 पर्यंतचे UPI पेमेंट मोफत

नवीन आराखड्यानुसार, ₹2,000 पर्यंतच्या व्यापारी पेमेंटला MDR मधून सूट देण्यात येईल. व्यक्ती-ते-व्यक्ती UPI हस्तांतरण, रकमेची पर्वा न करता, देखील मोफत असेल. सरकारच्या मते, या बदलामुळे अंदाजे 96% व्यापारी व्यवहारांवर परिणाम होणार नाही. लहान व्यवसायांसाठी स्वतंत्र सवलतीची तरतूदही जाहीर करण्यात आली आहे.

काही अत्यावश्यक आणि कमी नफ्याच्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. रेल्वे, दूरसंचार, विमा, इंधन आणि कृषी निविष्ठांशी संबंधित ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर ₹5 चा एकसमान MDR आकारला जाईल. तर म्युच्युअल फंड, सिक्युरिटीज, स्टॉक ब्रोकर्स आणि डीलर्सशी संबंधित पेमेंटवर 0.02% MDR आकारला जाईल, ज्याची कमाल मर्यादा ₹300 असेल.

सर्वोच्च न्यायालयापुढे कोणतं आव्हान?

अधिवक्ता अंजन दत्ता यांनी या नवीन चौकटीविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र सरकारच्या १४ सप्टेंबरच्या अधिसूचनेला आणि १५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या MDR चौकटीला आव्हान देण्यात आले आहे. तसेच, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट, २००७ च्या कलम १०अ मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवरही याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय

Web Title: Supreme court update on upi mdr charge 0 4 percent fee applicable from 15 october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Supreme Court
  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI वर लागणाऱ्या Charges चा गोंधळ Share खरेदीतही! ब्रोकर भरणार की गुंतवणूकदारांच्या खिशाला बसणार फटका?
1

UPI वर लागणाऱ्या Charges चा गोंधळ Share खरेदीतही! ब्रोकर भरणार की गुंतवणूकदारांच्या खिशाला बसणार फटका?

Digital Payments ला मोठा फटका! दुकानदारांनी घेतला निर्णय, 2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI; काळ्या कपड्याने झाकणार QR कोड
2

Digital Payments ला मोठा फटका! दुकानदारांनी घेतला निर्णय, 2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI; काळ्या कपड्याने झाकणार QR कोड

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत
3

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?
4

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.