
Supreme Court, Foreign Divorce, Indian Law, Hindu Marriage Act, Bigamy, Legal News
न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे.परदेशी न्यायालयाकडून घेतलेला घटस्फोट भारतात आपोआप वैध ठरत नाही. भारतीय कायद्याच्या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. भारतीय कायद्यानुसार विवाह विसर्जित करण्यासाठी, परदेशी न्यायालयाचा निर्णय देखील भारतीय कायदेशीर नियमांनुसार असणे आवश्यक आहे. यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १३ मध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे.
“हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत झालेल्या विवाहाच्या बाबतीत परदेशी न्यायालयाने दिलेला घटस्फोट भारतीय कायद्यातील वैध आधारांवरच असणे आवश्यक आहे. केवळ विवाह पूर्णपणे मोडल्याच्या कारणावरून दिलेला घटस्फोट भारतात आपोआप मान्य केला जाऊ शकत नाही.
म्हणजेच एखादी व्यक्ती परदेशी न्यायालयातून घटस्फोट घेऊन, भारतातही आपला पहिला विवाह संपुष्टात आला आहे असे गृहीत धरू शकत नाही. संबंधित घटस्फोट ज्या कारणावरून मंजूर झाला आहे, त्या कारणाला भारतीय कायद्यात मान्यता आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, परदेशातील घटस्फोटाचा निर्णय दुसऱ्या विवाहाच्या(Bigamy) प्रकरणात बचावासाठी वापरता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने भारतात झालेला पहिला विवाह भारतीय कायद्यानुसार संपुष्टात न आणता केवळ परदेशातील घटस्फोटाच्या आधारे दुसरा विवाह केल्यास त्याच्याविरोधात फौजदारी खटला दाखल होऊ शकतो.
Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला
विशेष म्हणजे, विवाहानंतर संबंधित व्यक्तीने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले असले तरी हा नियम लागू होऊ शकतो. परदेशात घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केला, तरी भारतातील पहिला विवाह आपोआप संपुष्टात येत नाही. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार पहिला विवाह वैध राहू शकतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयानुसार, परदेशी न्यायालयाच्या घटस्फोटाच्या निर्णयाला भारतात मान्यता मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता आवश्यक आहे.
नैसर्गिक न्यायाचे पालन आवश्यक: परदेशी न्यायालयाचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार दिलेला असावा.
फसवणूक नसावी: घटस्फोटाचा निर्णय फसवणुकीच्या आधारे मिळवलेला नसावा.
घटस्फोटाचे कारण वैध असावे: क्रूरता, परित्याग, व्यभिचार किंवा परस्पर संमती यांसारख्या भारतीय कायद्यात मान्य असलेल्या कारणांवर घटस्फोट दिलेला असावा.
एकतर्फी निर्णय नसावा: दुसऱ्या जोडीदाराने परदेशी न्यायालयाचे अधिकारक्षेत्र स्वीकारले नसेल आणि खटल्यात सहभाग घेतला नसेल, तर एकतर्फी निर्णय त्याच्यावर बंधनकारक ठरू शकत नाही.
वरील सर्व निकषांच्या आधारे केवळ परदेशी न्यायालयाकडून घटस्फोटाची डिक्री मिळवणे पुरेसे नाही. भारतात त्या निर्णयाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी भारतीय कायद्यातील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
Ans: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, परदेशी न्यायालयाकडून घेतलेला घटस्फोट भारतात आपोआप वैध ठरत नाही. तो वैध ठरण्यासाठी भारतीय कायद्यातील अटी आणि दिवाणी प्रक्रिया संहितेच्या (CPC) कलम १३ ची पूर्तता होणे आवश्यक आहे.
Ans: भारतीय कायद्यानुसार पहिला विवाह संपुष्टात न आणता केवळ परदेशी घटस्फोटाच्या आधारे दुसरा विवाह केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात द्विभार्या (Bigamy) प्रकरणी फौजदारी खटला दाखल होऊ शकतो.
Ans: होय, विवाह भारतात झाला असेल आणि नंतर संबंधित व्यक्तीने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले असले, तरीही भारतीय विवाहाचे कायदे लागू राहतात आणि पहिला विवाह कायदेशीररीत्या वैध राहू शकतो.