
रतन टाटा यांच्या जाण्याने 'टाटा ग्रुप' ढासळतोय का?
TATA Group Mega Layoff: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाणारी ‘टाटा ग्रुप‘ कंपनीमध्ये दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात हालचाल होत आहे. ते जिवंत असताना टाटाच्या कर्मचाऱ्यांना नोकरी बाबत सुरक्षित वाटायचे मात्र, त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कंपनीत उलथापालथ सुरू झाली आहे. टाटा समूहाकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. TCS मधील 12 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्यात येणार आहे.
टाटा समूहाची दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने 12 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर सुद्धा बरेच वाद झाले होते. कधीकाळी नोकरदार वर्गाला टाटाची नोकरी अगदी सरकारी नोकरी एवढी सुरक्षित आणि विश्वासार्थ वाटायची मात्र, या वर्षभरात टाटा समूहात अनेक भूकंप आले ज्याने कर्मचारी चिंतेत आहेत. नुकताच टीसीएसनंतर आता अजून एक टाटाच्या समूहातील कंपनीतून मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार आहे.
TATA Neu मध्येही मोठे ‘क्लिनअप’
देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा समूहात कर्मचाऱ्यांचे लेऑफचे संकट थांबत नाहीये. यापूर्वी TCS मधून तब्बल 12 हजार नोकरदार वर्गाला घरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण जलए होते. त्या धक्क्यातून बाहेर पडण्यापूर्वीच टाटा समूहाने अजून एक मोठा धक्का दिला आहे. टाटा समूहाची ई-कॉमर्स आणि डिजिटल कंपनी असलेली टाटा डिजिटल सुपर-ॲप TATA Neu मधून 50% पेक्षा जास्त नोकर कपात होणार आहे. कंपनीचे नवीन सीईओ सजित शिवनंदन यांनी हा निर्णय राबवल्या जाणाऱ्या मोठ्या पुनर्रचना मोहिमेअंतर्गत घेतल्याचे सांगितले जात आहे.
मिळलेल्या माहितीनुसार तिसऱ्या धोरणात्मक बदलाची टाटा डिजिटल सुरुवात करत असून सीईओ सजित शिवनंदन समूहातील कंपनीमध्ये बदल करत आहेत. सुपरॲप, TATA Neu, जीएमव्ही पासून दूर जाऊन गट-स्तरीय एकत्रीकरणाची योजना आखत आहेत. याचाच एक भाग म्हणून TATA Neu मधून 50% हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे.
सलग कपातींनी कर्मचारी तणावात
सप्टेंबरमध्ये टाटा डिजिटलचे सीईओ शिवनंदन यांनी महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. कामकाज सुलभ होण्यासाठी 50% कर्मचारी कमी करणार असून बिगबास्केट आणि क्रोमामध्येही नोकर कपात सुरू आहे. बिगबास्केट आणि क्रोमा यांच्यासाठी नवीन रोडमॅप बनवले जात आहे. टाटा समूहाने डिजिटल मार्केटिंगसाठी टायटन, IHCL, टाटा मोटर्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स मध्ये केंद्र सुरू आहेत.