Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors-Think Gas: टाटा मोटर्स-थिंक गॅसची भागीदारी, एलएनजी ट्रकिंग नेटवर्कला नवीन चालना

टाटा मोटर्स आणि थिंक गॅस यांनी भारताच्या स्वच्छ आणि शाश्वत मालवाहतुकीला पुढे नेण्यासाठी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्या एलएनजी रिफ्युएलिंग नेटवर्क मजबूत करून देशभरात डीकार्बोनाइज्ड ट्रकिंगला गती देतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2025 | 12:00 PM
टाटा मोटर्स-थिंक गॅसची भागीदारी, एलएनजी ट्रकिंग नेटवर्कला नवीन चालना

टाटा मोटर्स-थिंक गॅसची भागीदारी, एलएनजी ट्रकिंग नेटवर्कला नवीन चालना

Follow Us
Close
Follow Us:
  • एलएनजी नेटवर्कसाठी टाटा मोटर्स आणि थिंक गॅस भागीदार
  • स्वच्छ आणि शाश्वत ट्रकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पावले
  • इंधन गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर संयुक्त लक्ष केंद्रित

Tata Motors joins hands with Think Gas : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने थिंक गॅससोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ज्यामुळे भारताच्या स्वच्छ मालवाहतुकीच्या मोहिमेला एक नवीन चालना मिळाली आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट देशभरातील एलएनजी (लिक्विड नॅचरल गॅस) आधारित ट्रकिंग नेटवर्क मजबूत करणे आहे. या सहयोगाचा पायाभूत सुविधा सुसज्‍जता वाढवण्‍याचा, इंधन दर्जाबाबत अधिक जागरूकतेचा प्रसार करण्याचा आणि एलएनजी-समर्थित व्‍यावसायिक वाहनांच्‍या व्‍यापक अवलंबनाला सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे शुद्ध व अधिक डिकार्बनाइज्‍ड मालवाहतूक कार्यसंचालनांच्‍या दिशेने परिवर्तनाला गती मिळेल.

या सहयोगाचा भाग म्‍हणून टाटा मोटर्स थिंक गॅससोबत कसून काम करत एलएनजी पायाभूत सुविधा विस्‍तारीकरणासाठी संभाव्‍य मालवाहतूक मार्ग व लॉजिस्टिक्‍स क्‍लस्‍टर्सना ओळखेल. थिंक गॅस इंधन दर्जा व पुरवठा विश्वसनीयतेचे उच्‍च मानक राखण्‍यावर लक्ष केंद्रित करेल, तसेच सानुकूल वाहन कामगिरी व कार्यक्षमतेची खात्री घेईल. टाटा मोटर्स ग्राहकांना विशेष फायद्यांसह प्राधान्‍य किमती देखील देण्‍यात येतील.

गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख राजेश कौल यांनी सांगितले की, “भारत शाश्वत व कार्यक्षम मालवाहतूक हालचालीच्‍या दिशेने वाटचाल करत असताना एलएनजी लांब पल्‍ल्‍याच्‍या व हेवी-ड्युटी ट्रकिंगसाठी लक्षवेधक सोल्‍यूशन सादर करते. एलएनजीची क्षमता लवकर ओळखत आम्‍ही प्रबळ सोल्‍यूशन्‍स विकसित केले आहेत, जे उच्‍च इंधन कार्यक्षमता, कमी उत्‍सर्जन आणि उच्‍च दर्जाची कामगिरी देतात. थिंक गॅससोबत या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचे परिसंस्‍थेची सुसज्‍जता मजबूत करण्‍याचे ध्‍येय आहे, ज्‍यामधून विश्वसनीयपणे रिफ्यूएलिंग पायाभूत सुविधा उपलब्‍ध होण्‍याची खात्री मिळेल आणि ताफा ऑपरेटर्स आत्‍मविश्वासाने एलएनजीचा अवलंब करण्‍यास सक्षम होतील. हा सहयोग भारतातील व्‍यावसायिक वाहन उद्योगासाठी शुद्ध, भविष्‍याकरिता सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रगत करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील आणखी एक पाऊल आहे.”

थिंक गॅसचे प्रतिनिधीत्‍व करत वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख (एलएनजी फ्यूएल)सोमिल गर्ग यांनी सांगितले की, “थिंक गॅसमध्‍ये आमचा संपूर्ण भारतात शुद्ध इंधन सहजसाध्‍य व किफायतशीर करण्‍याचा मनसुबा आहे. पर्यायी-इंधन गतीशीलता प्रगत करण्‍यामध्‍ये अग्रणी टाटा मोटर्ससोबत सहयोग आम्‍हाला धोरणात्‍मकरित्‍या आमचे विस्‍तारीकरण वाढवण्‍यास मदत करेल. आमचे जागतिक गुंतवणूकदार आय-स्‍क्‍वेअर्ड कॅपिटल, ओसाका गॅस, सूमिटोमो कॉर्पोरेशन, Konoike ट्रान्‍सपोर्ट, जॉइन यांच्‍या पाठबळासह आम्‍ही देशभरात प्रबळ, सुरक्षित आणि शाश्वत एलएनजी नेटवर्क निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”
टाटा मोटर्स बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंटर्नल कम्‍बशन आणि हायड्रोजन फ्यूएल सेल अशा पर्यायी इंधन तंत्रज्ञानांद्वारे समर्थित नाविन्‍यपूर्ण गतीशीलता सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. कंपनीचा स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स, ट्रक्‍स, बसेस व व्‍हॅन्‍स अशा विविध श्रेणींमध्‍ये पर्यायी-इंधनाची शक्‍ती असलेल्‍या व्‍यावसायिक वाहनांचा प्रबळ पोर्टफोलिओ आहे.

थिंक गॅस सध्‍या १८ लिक्विफाइड व कम्‍प्रेस्‍ड नॅच्‍युरल गॅस (एलसीएनजी) स्‍टेशन्‍सचे कार्यसंचालन पाहते, तसेच विविध अतिरिक्‍त स्‍टेशन्‍सचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्‍यांचा प्रस्‍तावित एलसीएनजी कॉरिडर देशभरातील प्रमुख औद्योगिक केंद्रे, कृषी प्रांत आणि लॉजिस्टिक्‍स केंद्रांना कनेक्‍ट करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा कॉरिडर महत्त्वपूर्ण परिवहन मार्गांची पूर्तता करेल, ज्‍यामुळे उत्‍पादन, वेअरहाऊसिंग, निर्यात आणि कृषी पुरवठा साखळी यामध्‍ये कार्यरत असलेल्‍या ताफ्यांसाठी कार्यक्षम व विश्वसनीय LNG फ्यूएलिंग उपलब्‍ध होईल.

Reliance आणि Google ची भागीदारी, जिओ युजर्सना मिळणार 18 महिन्यापर्यंत AI Access

 

Web Title: Tata motors joins hands with think gas to strengthen indias lng trucking network

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Business News
  • tata motors

संबंधित बातम्या

फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार
1

फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार

मोठी बातमी! सौदी अरेबियाला जाणे झाले सुपरफास्ट; ‘डिजिटल KSA Visa Platform’ लाँच, आता मिनिटांत मिळेल व्हिसा
2

मोठी बातमी! सौदी अरेबियाला जाणे झाले सुपरफास्ट; ‘डिजिटल KSA Visa Platform’ लाँच, आता मिनिटांत मिळेल व्हिसा

गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 76 स्टेशन्सवर होणार होल्डिंग एरिया; रेल्वेमंत्र्यांनी दिली मंजुरी
3

गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 76 स्टेशन्सवर होणार होल्डिंग एरिया; रेल्वेमंत्र्यांनी दिली मंजुरी

Reliance आणि Google ची भागीदारी, जिओ युजर्सना मिळणार 18 महिन्यापर्यंत AI Access
4

Reliance आणि Google ची भागीदारी, जिओ युजर्सना मिळणार 18 महिन्यापर्यंत AI Access

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.