Maruti Dzire CNG व्हेरिएंट घरी आणण्याचा फुल प्रूफ प्लॅन
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार्स ऑफर करत असतात.अशीच एक कंपनी म्हणजे Maruti Suzuki. कंपनीने नेहमीच भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. यामुळेच तर कंपनी कित्येक वर्षांपासून भारतीयांची आवडती लोकप्रिय ऑटो कंपनी ठरली आहे. Maruti Suzuki Dzire ही कंपनीची लोकप्रिय कार आहे.
एसयूव्ही सेगमेंटसह कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये येणाऱ्या मारुती डिझायरला भारतीय बाजारातही मोठी मागणी आहे. जर तुम्ही या सेडानचा सीएनजी व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चला जाणून घेऊयात 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा किती ईएमआय द्यावा लागेल?
फेस्टिव्ह सिझनमध्ये ग्राहक Tata Motors वर मेहेरबान! धडाधड विकल्या गेल्या गाड्या
मारुती डिझायरचा सीएनजी व्हेरिएंट म्हणून VXI ऑफर केली जाते. कंपनी या कॉम्पॅक्ट सेडानचा बेस व्हेरिएंट 8.03 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विकत आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली असेल तर 8.03 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन टॅक्सआणि आरटीओ शुल्क देखील भरावे लागतील. ही कार खरेदी करण्यासाठी, आरटीओसाठी सुमारे 75 हजार रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 30 हजार रुपये द्यावे लागतील. यानंतर, या कारची ऑन-रोड किंमत 9.09 लाख रुपये होईल.
जर तुम्ही Maruti Dzire चा CNG वेरिएंट VXI खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक केवळ ex-showroom किंमतीवरच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देईल. अशा परिस्थितीत तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट दिल्यानंतर सुमारे 7.09 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार
बँकेकडून जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.09 लाखचे कर्ज मिळाले, तर पुढील 7 वर्षांसाठी दरमहा 11,412 रुपयांइतका EMI तुम्हाला भरावा लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.09 लाखांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला दरमहा 11,412 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे 7 वर्षांत सुमारे 2.49 लाख रुपये तुम्ही फक्त व्याज म्हणून भराल. त्यामुळे Maruti Dzire VXI CNG व्हेरिएंटची ex-showroom किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून एकूण किंमत सुमारे 11.58 लाख रुपये होईल.






