Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tetra Pak India : ड्रिंकटेक इंडिया 2025 मधील ‘या’ कंपनीचा अभिनव उपक्रम! बिव्हरेज उद्योगासाठी खर्च कमी करण्यासाठी घेणार पुढाकार

ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये प्रख्यात फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग सोल्यूशन्स कंपनी Tetra Pak भारतातील बिव्हरेज निर्मात्यांना त्यांच्या कामकाजाचा एकूण खर्च कमी करण्यास, उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 12, 2025 | 04:12 PM
Tetra Pak India company's innovative initiative in DrinkTech India 2025

Tetra Pak India company's innovative initiative in DrinkTech India 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये Tetra Pak कंपनीचा उपक्रम
  • उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने करणार वाटचाल
  • भारतीय बिव्हरेज उद्योगासाठी ठरू शकते संजीवनी

Tetra Pak India : ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये प्रख्यात फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग सोल्यूशन्स कंपनी Tetra Pak भारतातील बिव्हरेज निर्मात्यांना त्यांच्या कामकाजाचा एकूण खर्च कमी करण्यास, उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दिशेने पुढे जाण्यास सक्षम करत आहे.

या प्रदर्शनादरम्यान Tetra Pak ने उपक्रम, तंत्रज्ञान आणि उपाय सादर केले जे भारतीय बिव्हरेज उद्योगासाठी आणि पर्यावरणपूरक गोष्टींसाठी महत्वाचे आहे. त्यात स्थानिक उत्पादन, नवकल्पना, कमी ऊर्जेचा वापर, आणि नवनवीन पॅकेजिंग स्वरूप यांचा समावेश आहे. Tetra Pak च्या तंत्रज्ञानामुळे उत्पादकांना उत्पादनाच्या सर्व टप्प्यांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. वेळ आणि जलद काम करण्यासाठी हे तंत्र वापरले तर सोईस्कर होऊ शकते. यामुळे संसाधनांचा वापर कमी, आणि उत्पन्नाची गती वाढवणे हे त्यातील मुख्य मुद्दे आहेत.

हेही वाचा : आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध

शुगर सायरपसाठी मेड-इन-इंडिया हॉरिझॉन्टल फिल्टर त्यांनी सादर केला ज्यामुळे फिल्टर प्रक्रिया सुधारली आणि अस्थिर घटकांचा अपव्यय कमी झाला.  तसेच त्यांनी टेट्रा पॅक® E3/स्पीड हायपर नावाने जगातील सर्वात वेगवान असेप्टिक कार्टन फिलिंग मशीन प्रदर्शित केले आहे, ज्याद्वारे प्रति तास अंदाजे 40,000 पॅक तयार होऊ शकतात, हे उत्पादन गती आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल असल्याचे म्हंटले जात आहे.

Tetra Pak विविध प्रकारच्या बिव्हरेज कॉन्सेप्टसाठी उपाय सुचवत आहे. म्हणजेच, भारतातील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार, अर्थात कमी साखर असलेले पेयांची वाढती मागणी, इलेक्ट्रोलाइट्स घटकांनी समृद्ध पेये, प्रथिनेयुक्त दुग्ध किंवा वनस्पती-आधारित पेये, या सगळ्या नव्या कल्पना या उद्योगांना नव्याने उभारी देतील ज्याने नवीन बाजारपेठा गाठायला मदत होईल.

हेही वाचा : Russian Oil Trade India Update: ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय! रशियाकडून भारताने…

Tetra Pak ने भारतातील पहिले असे बिव्हरेज कार्टन सादर केले आहेत ज्यात सुमारे 5% प्रमाणात प्रमाणित रिसायकल केलेले पॉलिमर वापरले गेले आहेत. यामुळे प्रदूषणाला आळा बसण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरू शकते. व्यवसाय क्षेत्रात जे नविन विचार घेऊन येत आहे त्यांच्यासाठी टेट्रा पॅक कंपनी नवीन सोपे तंत्रज्ञान आणि प्रक्रियेचा संपूर्ण पुरवठा  यांचा विचार करून त्यांच्या कामात सुलभता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. Tetra Pak चे स्थानिक उत्पादन अर्थात मेड़-इन-इंडिया या तंत्रज्ञान आणि पॅकेजिंग हे भारतीय बाजाराच्या गरजा, खर्च यांवर रचलेले आहेत, ज्यामुळे स्थानिक कंपन्या याचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेऊ शकतात.

Tetra Pak ने ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये सादर केलेले उपाय हे भारतीय बिव्हरेज उद्योगासाठी उपाय केवळ खर्च कमी करण्यावर नाही, तर गुणवत्तेवरही लक्ष देणार आहेत. बिव्हरेज निर्मात्यांना आता पारंपरिक उत्पादन आणि पॅकेजिंग पद्धतींना आव्हान देऊन नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे लागणार आहे, ज्यामुळे त्यांचा फायदा वाढेल.

Web Title: Tetra pak india companys innovative initiative in drinktech india 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Business Idea
  • financial gain
  • Package

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.