Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay FD Return: ना रिस्क, ना टेन्शन…, FD गुंतवणुकीतून दर महिना 54 लाख कमवतात Thalapathy Vijay

तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या नवीन पक्षाद्वारे जोरदार एन्ट्री करणारे सुपरस्टार 'थलापती' विजय सध्या त्यांच्या राजकीय यशामुळे जितके चर्चेत आहेत तितकेच ते आर्थिक नियोजनामुळे चर्चेत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 08, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विजय राजकीय यशासोबत आर्थिक नियोजनामुळे चर्चेत
  • गुंतवणुकीच्या बाबतीतही ‘सुपरस्टार’
  • काय आहे विजय यांची नेटवर्थ?
Vijay FD Return: तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या नवीन पक्षाद्वारे जोरदार एन्ट्री करणारे सुपरस्टार ‘थलापती’ विजय सध्या त्यांच्या राजकीय यशामुळे जितके चर्चेत आहेत तितकेच ते आणखी एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे त्यांचं जबरदस्त आर्थिक नियोजन. हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. राजकारणातील वाऱ्यांसोबतच सध्या त्यांच्या आर्थिक नियोजनाचं मुळ जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच जणांना लागून राहिली असेल तर चला तर मग जाणून घेऊयात नेमकी अशी काय प्लॉनिंग विजय करतात ज्यामुळे त्यांचं आर्थिक नियोजन इतकं प्रभावी आहे.

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?

गुंतवणुकीच्या बाबतीतही ‘सुपरस्टार’

निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या आर्थिक गणिताचा पाढा समोर आला. त्यात दिलेल्या माहितीनुसार विजय केवळ अभिनयातच नव्हे तर गुंतवणुकीच्या बाबतीतही ‘सुपरस्टार’ ठरले आहेत असा म्हणता येईल. तामिळनाडूच्या राजकारणात नवीन पक्ष स्थापन करून आणि सर्वाधिक जागा जिंकून इतिहास घडवणारे ‘थलपती विजय’ हे कमाईच्या बाबतीतही कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाहीत. त्यांनी FDsमध्ये मोठी रक्कम गुंतवली असून, त्यावरील व्याजाद्वारे ते दरमहा भरीव उत्पन्न मिळवतात.

काय आहे विजय यांची नेटवर्थ?

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, थलापती विजय यांची एकूण संपत्ती ६२४ कोटी रुपये आहे. या संपत्तीची विभागणी खालीलप्रमाणे आहे:
अचल संपत्ती म्हणजेच Immovable Assets ही संपत्ती २२० कोटी रुपये आहे ज्यात जमीन, घरे इत्यादींचा समावेश होतो. तर चल संपत्ती म्हणजेच Movable Assets ही संपत्ती ४०४ कोटी रुपये इतकी आहे ज्यात रोख रक्कम, दागिने, गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. यात कमाईच्या साधनांमध्ये स्वतःचा व्यवसाय, घरांचे भाडे आणि गुंतवणुकीवरील व्याज ही त्यांच्या उत्पन्नाची मुख्य साधने असल्याचं समोर येत आहे.

उत्पन्नाचा मुख्य स्रोत

Fixed Deposits वरील व्याजातून मिळणारी रक्कम हाच त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे; कारण थलापती विजय यांनी त्यांच्या एकूण ₹६२४ कोटींच्या संपत्तीपैकी तब्बल ₹१०० कोटींची गुंतवणूक FDs मध्ये केली आहे. या मुदत ठेवींवरील व्याजाचा दर ६.२५% ते ७.५०% च्या दरम्यान आहे.सरासरी ६.५% परतावा मिळेल असे गृहीत धरल्यास, थलापती विजय केवळ व्याजाच्या उत्पन्नातून दरमहा अंदाजे ₹५४ लाख कमवू शकतात. याचाच अर्थ त्यांचे वार्षिक उत्पन्न ₹६.५ कोटी इतके होते.

शेअर बाजाराच्या तुलनेत जोखीम कमी

मुदत ठेवींमधील गुंतवणुकीत शेअर बाजाराच्या तुलनेत जोखीम कमी असते, असेही सर्वत्र मानले जाते. याचे कारण असे की, यामध्ये गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदराची हमी मिळते आणि त्यांची मूळ रक्कमही सुरक्षित राहते अर्थात, खुद्द ती बँकच दिवाळखोरीत निघणे किंवा कोसळणे यांसारखी अत्यंत दुर्मिळ घटना घडल्यास मात्र परिस्थिती वेगळी असू शकते.

थलापती विजय यांनी मुदत ठेवींमध्ये केलेल्या या मोठ्या गुंतवणुकीनंतर, गुंतवणुकीच्या या पर्यायाबाबत लोकांच्या मनात कुतूहल आणि स्वारस्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर तर काही वापरकर्त्यांनी, मुदत ठेवींमधील गुंतवणूक हा ‘म्युचुअल फंड’पेक्षा अधिक चांगला पर्याय आहे की नाही, यावर चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे. पण हे दोन्ही गुंतवणुकीचे प्रकार पूर्णपणे भिन्न आहेत; आणि यापैकी कोणत्या पर्यायाची निवड करावी, हे शेवटी गुंतवणुकीची नेमकी रक्कम आणि संबंधित गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे यांवरच अवलंबून असते.

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, बाजारात मोठी घसरण होणार का?

Web Title: Thalapathy vijay net worth fixed deposit investment earning from interest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • FD
  • share market
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; व्यवहार करताना राहा सावध, ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; व्यवहार करताना राहा सावध, ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market News: शेअर बाजारातून चांगला परतावा हवा? डॉ. विकास व्ही गुप्ता म्हणतात की…
2

Share Market News: शेअर बाजारातून चांगला परतावा हवा? डॉ. विकास व्ही गुप्ता म्हणतात की…

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी
3

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना
4

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.