Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, बाजारात मोठी घसरण होणार का?
गुरुवारी, नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, मात्र निफ्टी ५० २४,३०० च्या पातळीच्या वर टिकून होता. सेन्सेक्स ११४.०० अंकांनी, म्हणजेच ०.१५% ने घसरून ७७,८४४.५२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४.३० अंकांनी, म्हणजेच ०.०२% ने घसरून २४,३२६.६५ वर स्थिरावला. आज देखील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळणार का, अशी चिंता गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदांराना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये भारत डायनॅमिक्स , सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स आणि आरबीएल बँकेच्या शेअर्सचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही स्टॉक्सची निवड केली आहे. ज्यामध्ये सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनी लिमिटेड, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), भारत फोर्ज लिमिटेड आणि रॅडिको खैतान लिमिटेड समाविष्ट आहे.
“मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार बीएसई, सीजी पॉवर, एमक्योर फार्मा, केफिन टेक, आयआरएफसी, जीई वर्नोव्हा, डीएफसीएक्स सिस्टीम्स आणि नेल्को या शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्रीसाठी आयईएक्स, केईसी इंटरनॅशनल आणि सुला वाईनयार्ड्स या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे.






