Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुनी पेन्शन योजना आणि नव्या पेन्शन योजनेत ‘हा’ आहे फरक, कोणकोणत्या राज्यात होणार लागू, राज्य सरकारवर किती पडणार बोजा? वाचा सविस्तर

केंद्रातील अटबलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच २००३ साली जुनी पेन्शन योजना बंद करुन नॅशनल पेन्शन योजना (NPS) लागू केली असताना देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत असून त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडत आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 25, 2023 | 08:47 PM
जुनी पेन्शन योजना आणि नव्या पेन्शन योजनेत ‘हा’ आहे फरक, कोणकोणत्या राज्यात होणार लागू, राज्य सरकारवर किती पडणार बोजा? वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जुनी पेन्शन योजना (Maharashtra Old Pension Scheme) हा मुद्दा केंद्र बिंदू बनला आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांनी ही योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत पण जर जुनी पेन्शन योजना (OPS) लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर जवळपास ५५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. तसेच जुन्या कर्मचाऱ्यांच्या आणि नव्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रकमेत मोठी तफावत आढळण्याचीही शक्यता आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे असं ते मोठ्या तोऱ्यात सांगत आहेत.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान केले असले तरी फडणवीस यांच्या कपटनितीची शिक्षकांनाही कल्पना आहेच. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ आहे तर मग पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलं काय?

केंद्रातील अटबलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच २००३ साली जुनी पेन्शन योजना बंद करुन नॅशनल पेन्शन योजना (NPS) लागू केली असताना देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत असून त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आरएसएसच्या शिकवणुकीनुसार धादांत खोटे बोलण्यात पटाईत असतात, त्याप्रमाणे फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे खापर काँग्रेसवर फोडले.

[read_also content=”‘मेरा जो मन करेगा वो मैं करूंगी’, आफताबच्या प्रश्नाला दिलं होतं जशास तसं उत्तर, जाणून घ्या हत्येच्या दिवशी काय आणि कसं घडलं https://www.navarashtra.com/crime/shraddha-walker-murder-case-update-accused-aftab-poonawalla-chargesheet-disclosure-incident-day-dispute-quarrel-murder-delhi-police-crime-investigation-nrvb-364534.html”]

नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला शक्य नाही असे स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी सांगितले होते. मग आताच फडणवीस यांच्यात धमक कुठून आली. नागपूरच्या अधिवेशनात किंवा मागील ५ वर्षे मुख्यमंत्री असताना ही धमक कोठे गेली होती?

राज्याच्या तिजोरीवर ५५ हजार कोटींचा अतिरिक्त भार

राज्यात जवळपास १६ लाख १० हजार शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारावर राज्य शासनाला वर्षाला ५८ हजार कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. आता जर जुनी पेन्शन योजना लागू झाली आणि ती २००४ पासून लागू करण्याचा निर्णय झाला तर राज्य सरकारच्या तिजोरीवर ५० ते ५५ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. शिक्षकांच्या पेन्शनवर राज्य सरकारला ४ ते ४.५ हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च येईल.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा केवळ पाठिंबाच नसून काँग्रेस शासित राज्ये राजस्थान, छत्तीसगड, व हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना लागूही केली आहे. ही राज्ये जुनी पेन्शन योजना राबवू शकतात तर मग महाराष्ट्र हे तर प्रगत राज्य आहे, ही योजना लागू केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडेल हे फडणवीसांचे म्हणणे चुकीचे वाटते. सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव व काँग्रेस शासित राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा विचार बदललेला दिसतो अशी चौफेर टीकाही फडणवीस यांच्यावर होताना दिसत आहे.

[read_also content=”महिला IPL मध्ये रंगणार अदानी VS अंबानी Match, दोघेही विकत घेणार संघ, BCCI चं तर उखळच पांढरं झालंय, ऐकून तुम्हालाही येईल फेफरं https://www.navarashtra.com/sports/women-premier-league-wpl-2023-team-auction-ambani-adani-team-owners-jay-shah-bcci-women-ipl-2023-tweets-nrvb-364494.html”]

जुन्या पेन्शन योजनेनुसार मृत्यूपर्यंत वेतनाच्या ५० टक्के मिळत होते पेन्शन

जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना त्याच्या निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के वेतन मृत्यूपर्यंत मिळेल. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला ३० टक्के रक्कम तिच्या मृत्यूपर्यंत पेन्शन स्वरुपात मिळेल. मात्र नवीन पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार नाही तर पगारातून पैसे कपात होऊन जेवढी रक्कम जमा होईल त्यावर पेन्शन मिळेल. ही योजना बाजार गुंतवणुकीवर आधारित असल्याने जमा रक्कमेवर पेन्शन मिळेल. नव्या पेन्शनचा विचार करता हा सौदा तसा तोट्याचाच आणि सरकारचा खेळ आतबट्ट्याचा असंच म्हणणं कदाचित योग्य ठरेल.

क वर्गाच्या कर्मचाऱ्यालाही मिळणार ३० हजार रुपये पेन्शन

राज्यात जर जुनी पेन्शन योजना लागू झाली आणि आज एखादा कर्मचारी निवृत्त झाला तर क गटातील कर्मचाऱ्याला अंदाजे ३०,००० रुपये पेन्शन स्वरुपात मिळेल आणि त्यात वाढ होत जाईल. मात्र नवीन पेन्शन योजनेत सध्या जमा असलेल्या रक्कमेवर ५,००० रुपयांच्यावर पेन्शन मिळणे शक्य नाही असं मत जाणकार व्यक्त करत आहेत. मग आजच्या काळात सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीने एवढ्या तुटपुंज्या रकमेवर त्याचं उर्वरित आयुष्य कसं जगायचं हाच त्याच्यापुढचा यक्षप्रश्न असणार आहे.

Web Title: The difference between the old pension scheme and the new pension scheme applicable in which state how much burden will fall on the state government read in detail nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2023 | 08:47 PM

Topics:  

  • difference
  • old pension scheme

संबंधित बातम्या

कारची एक्स शोरूम स्वस्त मात्र ऑन रोड किंमत महाग, नक्की भानगड काय? सोप्या पद्धतीने जाणून घ्या
1

कारची एक्स शोरूम स्वस्त मात्र ऑन रोड किंमत महाग, नक्की भानगड काय? सोप्या पद्धतीने जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.