
GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?
Policybazaar.com च्या गुंतवणूक प्रमुख पाविता लौल म्हणतात की लोक GRP कडे वाढत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे खात्रीशीर आणि स्थिर परतावा आहे. एकेकाळी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या FD देखील आता पूर्वीसारखे परतावे देत नाहीत, परंतु गॅरंटीड रिटर्न प्लॅन खरेदी केल्यावर परतावा लॉक करतात. महागाईला मागे टाकणारे परतावे मिळवणे अधिक कठीण होत चालले आहे. याउलट, GRP बाजारातील अस्थिरतेकडे दुर्लक्ष करून संपूर्ण कालावधीत निश्चित परतावा देतात.
गॅरंटीड रिटर्न प्लॅन लोकप्रिय का आहेत?
हेही वाचा : Donald Trump: ट्रम्पचं आर्थिक साम्राज्य धुळीस! बिटकॉईन क्रॅशने 9,800 कोटींचा फटका
ज्यांना 5 ते 30 वर्षांसाठी मासिक अथवा वार्षिक उत्पन्न मिळवायचे आहे तेही याचा वापर करू शकतात. काही लोकांना गुंतवणूक केल्यानंतर लगेच उत्पन्न हवे असते; यासाठी तात्काळ उत्पन्न योजना सुद्धा उपलब्ध आहेत. काही लोक अशा योजना निवडतात ज्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्थिर उत्पन्न प्रदान करतात, जसे की पेन्शन यासाठी देखील हे योग्य आहे.
यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार त्यांच्या जीवनातील ध्येय आणि बजेटनुसार पर्याय निवडू शकतो. GRPs मध्ये जीवन विमा संरक्षण देखील समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करता येते. जरी घरचा कर्ता गेला तरी कुटुंबाची स्वप्ने आणि दीर्घकालीन उद्दिष्टे अप्रभावित राहतात. म्हणूनच आज या योजना विशेषतः तरुण पालकांमध्ये, मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आणि नवीन गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत.