4 वर्षात तब्बल शेअरमध्ये 1521 टक्क्यांची तुफानी तेजी, गुंतवणूकदारांना करोडपती करणारी 'ही' कंपनी कोणती?
आठवड्याचा पहिला दिवस मुंबई शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. शेअर बाजारातील ही वाढ प्रामुख्याने गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात केलेल्या चौफेर खरेदीमुळे झाली आहे. यात मुख्यत: बँकिंग आणि आयटी शेअर्सची खरेदी सर्वाधिक राहिली आहे. आज (ता.१४) शेअर बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ५९१.६९ अंकांच्या उसळीसह ८१,९७३.०५ अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १६३.७० अंकांच्या वाढीसह, २५,१२७.९५ अंकांवर बंद झाला आहे.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण, कोणता शेअर वधारला
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स हे वाढीसह आणि 10 शेअर्स हे तोट्यासह बंद झाले आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्स हे वाढीसह आणि 15 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत. वाढत्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा २.९३ टक्के, एचडीएफसी बँक २.२९ टक्के, एल अँड टी १.८९ टक्के, आयटीसी १.७८ टक्के, इंडसइंड बँक १.६३ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.५५ टक्के वाढीसह बंद झाले आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी 1.81 टक्के, टाटा स्टील 1.49 टक्के, बजाज फायनान्स 1.18 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.67 टक्के, नेस्ले 0.39 टक्के, ॲक्सिस बँक 0.36 टक्क्यांनी घसरले आहेत.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला; प्रमोटर्संचे हजारो कोटींचे नुकसान!
बँकिंग, आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ
आज शेअर बाजारातील व्यवसायात बँकिंग, आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. निफ्टी बँकिंगचा निर्देशांक 1.26 टक्के किंवा 644 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. तर निफ्टी आयटीचा निर्देशांक 537 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. याशिवाय फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑटो सेक्टरचे शेअर्स तेजीने बंद झाले आहेत. घसरणाऱ्या स्टॉक्समध्ये धातू, माध्यमे आणि वस्तूंचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मजबूत वाढीसह बंद झाले आहे.
तेजीसह मार्केट कॅपमध्ये १.४९ लाख कोटींची वाढ
शेअर बाजारातील तेजीमुळे लिस्टेड समभागांचे मार्केट कॅप वाढीसह बंद झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार भांडवल 463.76 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील ट्रेडिंग सत्रात 462.27 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)