रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा... असे का म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास!
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशभरातील बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. राजधानी नवी दिल्ली येथे सोमवारी (ता.१४) एका उच्चस्तरीय परिषदेला संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला आहे. सेंट्रल बँकिंग ऑन क्रॉसरोड्स या विषयावर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या भाषणात बँकांच्या कार्यपद्धतीबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांनी देशातील बँकांना काही गोष्टींबद्दल सतर्क केले आहे. जेणेकरून बॅंकांना सध्याच्या जागतिक आव्हानात्मक परिस्थितीत सुरळीतपणे काम करण्यास मदत होणार आहे.
चलनविषयक धोरणातील बदलांमुळे काय होणार
रिझर्व्ह बँकेच्या RBI@90 उपक्रमांतर्गत नवी दिल्लीतील उच्चस्तरीय परिषदेतील भाषणात गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले आहे की, आजची जागतिक अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक एकात्मिक आहे. जगभरातील बँकांच्या चलनविषयक धोरणातील बदलांमुळे भांडवलाचा प्रवाह वाढेल आणि विनिमय दरात अस्थिरता आहे. रिझर्व्ह बँक आपल्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण करत आहे, त्यानिमित्त देशात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सोशल मीडिया क्षेत्रात बँकांना सावध राहावे लागेल, यासोबतच त्यांना त्यांची तरलता बफर म्हणजेच बँकांमधील तरल पैशाचा प्रवाह कोणत्याही वाईट परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत ठेवावा लागेल. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
हे देखील वाचा – सणासुदीत सर्वसामान्यांना महागाई झटका; सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 1.84 टक्क्यांवर!
भविष्यातील बदलाची नांदी
भविष्यात रिझर्व्ह बँकेच्या कार्यप्रणालीमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन बॅंकांनी तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावा, असा माझा प्रस्ताव आहे. ही तीन क्षेत्रे म्हणजे चलनविषयक धोरण, आर्थिक स्थिरता आणि नवीन तंत्रज्ञान … हा देखील एक विषय आहे.” असेही गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले आहे.
हे देखील वाचा – रतन टाटांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत माहितीये का? साधेपणा पाहून भारावून जाल…
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरसमोर कोणती आव्हाने आहेत?
शक्तिकांत दास यांनी आपल्या भाषणात यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय बँक ऑफ जपान आणि सेंट्रल बँक ऑफ चायना यांच्या अलीकडील निर्णयांना लक्षात घेऊन हे सांगणे आवश्यक झाले आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सामान्य धोके आणि समान हित लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत. दरम्यान, अलीकडेच 9 ऑक्टोबर रोजी आरबीआयने आपले जैसे थे मौद्रिक धोरण निर्णय जाहीर केले होते. ज्यामध्ये रेपो दरासारखे धोरणात्मक दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.