Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ujani Dam परिसरात ‘द सीड’ मास्टरप्लॅन सादर; तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, बॅटरी स्टोरेज, AI डेटा सेंटर उभारणार

Ujani Dam Infrastructure Project : महाराष्ट्रातील उजनी धरण परिसरात जेडब्ल्यू ग्लोबल कंपनीकडून ‘द सीड’ (सस्टेनेबल इको-एंटरप्राइज डिस्ट्रिक्ट) या एकात्मिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा सादर करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 07, 2026 | 06:29 PM
उजनी धरण परिसरात 'द सीड' मास्टरप्लॅन सादर ( सौजन्य - सोशल मीडिया )

उजनी धरण परिसरात 'द सीड' मास्टरप्लॅन सादर ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Ujani Dam उजनी धरण परिसरात ‘द सीड’ मास्टरप्लॅन सादर
  • तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, बॅटरी स्टोरेज, AI डेटा सेंटर उभारणार
  • ४०,००० रोजगार निर्मितीची शक्यता
Ujani Dam Infrastructure Project : महाराष्ट्रातील उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एकात्मिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचा सर्वांगीण विकास आराखडा जेडब्ल्यू ग्लोबल कंपनीने आज सादर केला. ‘द सीड’ (सस्टेनेबल इको-एंटरप्राइज डिस्ट्रिक्ट) या संकल्पनेची पहिली प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणून या प्रकल्पाची कंपनीकडून कल्पना करण्यात आली आहे. अक्षय ऊर्जा, अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवकल्पना आणि चक्राकार अर्थव्यवस्थेचा विकास यांची सांगड घालून शाश्वत विकासाचे एक नवे प्रारूप निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ( Ujani Dam Infrastructure Project ) 

Share Market : पुन्हा बहरला… भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची तुफान फटकेबाजी! 3 दिवसांत तब्बल 29096 कोटींची गुंतवणूक

उजनी धरण परिसरातील या प्रस्तावित विकास प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरील अक्षय ऊर्जा निर्मिती, अत्याधुनिक बॅटरी ऊर्जा साठवणूक व्यवस्था आणि पुढील पिढीतील डिजिटल पायाभूत सुविधांचा समावेश असेल. यातून ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची एकात्मिक तसेच संसाधनांचा कार्यक्षम वापर करणारी परिसंस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.

द सीड’ ही संकल्पना केवळ पारंपरिक पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटरच्या उभारणीपुरती मर्यादित नसून, डेटा सेंटर्स, अक्षय ऊर्जा, शिक्षण, अन्नव्यवस्था, संस्कृती आणि सामुदायिक जीवन यांचा समन्वय साधणारा, कमी कार्बन उत्सर्जनावर आधारित आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणारा शाश्वत क्षेत्र विकसित करण्याची व्यापक दृष्टी त्यामागे आहे.

२,००० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

या प्रकल्पाचे तीन प्रमुख घटक असतील. यामध्ये उजनी जलाशयाच्या सुमारे ३,००० हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणारा २,००० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प, १,८०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली (बीईएसएस) आणि १,४०० मेगावॅट क्षमतेचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच उच्च कार्यक्षमता संगणन (एचपीसी) आधारित डेटा सेंटर यांचा समावेश आहे. दिवसा निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेचा वापर डेटा सेंटरच्या विजेच्या गरजा भागविण्यासाठी केला जाईल. अतिरिक्त ऊर्जेची साठवणूक बॅटरी प्रणालीमध्ये करून रात्रीच्या वेळी तसेच सौरऊर्जा निर्मिती कमी असलेल्या कालावधीत तिचा वापर केला जाईल.

अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन

या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ५०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित असून, २०३१ पर्यंत डेटा सेंटरची एकूण क्षमता १,४०० मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक असलेल्या वैधानिक, तांत्रिक आणि पर्यावरणविषयक मंजुरींच्या अधीन राहून प्रकल्पाची उभारणी केली जाईल.

उजनी प्रकल्प हा एकात्मिक दृष्टिकोन मांडणारा उपक्रम

या प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी बोलताना जेडब्ल्यू ग्रुपचे कामकाज संचालक संजय वाजे म्हणाले, “भारताच्या डिजिटल विकासाच्या पुढील टप्प्याला गती देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी उजनी प्रकल्प हा एकात्मिक दृष्टिकोन मांडणारा उपक्रम आहे. अक्षय ऊर्जा निर्मिती, बॅटरी ऊर्जा साठवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संगणकीय पायाभूत सुविधा यांची एकत्रित उभारणी करून तंत्रज्ञानातील प्रगती आणि संसाधनांचे जबाबदार व्यवस्थापन यांची सांगड घालणारे दीर्घकालीन प्रारूप विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे”.

“पर्यावरणविषयक बाबी, पाणी आणि ऊर्जेचे कार्यक्षम व्यवस्थापन तसेच परिसरातील स्थानिक समुदायांचे हित यांना प्राधान्य देत नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असेल. याशिवाय स्थानिक रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पूरक व्यवसायांच्या वाढीसाठीही या प्रकल्पात मोठी क्षमता आहे.”

पाणी व्यवस्थापनासाठी प्रस्तावित केलेली यंत्रणा

या प्रकल्पातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पाणी व्यवस्थापनासाठी प्रस्तावित केलेली यंत्रणा. प्रकल्पासाठी वर्षभरात कमाल ०.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता अपेक्षित आहे. डेटा सेंटरमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी ठेवण्यासाठी अत्याधुनिक क्लोज्ड-लूप, डायरेक्ट-टू-चिप लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, त्याला ड्राय कूलर्सची जोड दिली जाणार आहे. तसेच शून्य द्रव विसर्ग (झेडएलडी) प्रणाली प्रस्तावित असून, कोणतेही सांडपाणी जलाशयात सोडले जाणार नाही. प्रस्तावित तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीनंतरही जलाशयाच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे ९१ टक्के क्षेत्र या प्रकल्पाच्या बाहेर खुले राहणार आहे.

तरुणांना या नव्या रोजगार संधींचा लाभ घेता यावा

या प्रकल्पातून सुमारे २,८०० कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा असून, बांधकामाचा टप्पा, पुरवठा साखळी आणि पूरक सेवांसह सुमारे ४०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. डेटा सेंटरचे संचालन, विद्युत आणि यांत्रिक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, सौरऊर्जा प्रकल्पांचे संचालन, बॅटरी व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स आणि देखभाल अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. यासाठी पात्र स्थानिक तरुणांना या नव्या रोजगार संधींचा लाभ घेता यावा, यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचे उपक्रमही राबविण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

पायाभूत सुविधांची मागणी वेगाने वाढतेय

जेडब्ल्यू ग्रुपचे ग्लोबल डायरेक्टर मार्क बेली म्हणाले, “जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संगणकीय प्रक्रिया, डिजिटल सेवा आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या डेटा पायाभूत सुविधांची मागणी वेगाने वाढत आहे. विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा उपाययोजनांची सांगड घालून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्याची संधी भारतासमोर आहे. ‘द सीड’ ही संकल्पना याच समन्वयावर आधारित आहे.

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान मानकांची पूर्तता करणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित करतानाच संबंधित प्रदेशात दीर्घकालीन आर्थिक मूल्य निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर स्थानिक समुदायांशी सुरुवातीपासूनच संवाद आणि सहभाग वाढविणे तसेच आरोग्यसेवा, शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि सामुदायिक विकासाशी संबंधित उपक्रमांना पाठबळ देणे, यालाही आमच्या दृष्टीने तितकेच महत्त्व आहे.”

संबंधित विविध उपक्रम प्रस्तावित केले

प्रकल्पांतर्गत सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जेडब्ल्यू ग्रुपने भिमानगर परिसरात आरोग्य सुविधा, डिजिटल शिक्षण, शिष्यवृत्ती, तांत्रिक कौशल्य विकास आणि सामुदायिक पायाभूत सुविधांशी संबंधित विविध उपक्रम प्रस्तावित केले आहेत. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीला व्यापक स्थानिक विकासाच्या संधींची जोड देणे, हा या उपक्रमांमागील उद्देश आहे.

‘द सीड’ या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या अक्षय ऊर्जा परिसंस्थेला आणि डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्राला योगदान देतानाच तंत्रज्ञानाधारित आर्थिक प्रगती आणि प्रादेशिक विकासासाठी एक नवे व्यासपीठ निर्माण करण्याचा जेडब्ल्यू ग्लोबल कंपनीचा प्रयत्न आहे.

Gold Price Hike Strategy : सोन्याच्या दरात तुफान तेजी! 5 दिवसांत तब्बल 3 टक्क्यांची वाढ; गुंतवणूक करायचं हीच योग्य वेळ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'द सीड' प्रकल्पाचे मुख्य तीन घटक कोणते आहेत?

    Ans: १) उजनी जलाशयावर ३,००० हेक्टर क्षेत्रावर २००० मेगावॅटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, २) १८०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली (BESS), आणि ३) १४०० मेगावॅट क्षमतेचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डेटा सेंटर हे या प्रकल्पाचे मुख्य घटक आहेत.

  • Que: प्रकल्पामुळे पाण्याच्या वापरावर किंवा धरणाच्या पृष्ठभागावर काय परिणाम होईल?

    Ans: डेटा सेंटरमध्ये पाण्याचा पुनर्वापर करणारे क्लोज्ड-लूप लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान वापरले जाईल, तसेच कोणतेही सांडपाणी जलाशयात सोडले जाणार नाही (ZLD प्रणाली). याशिवाय, सौर प्रकल्पानंतरही धरणाचा ९१% पृष्ठभाग मोकळाच राहील.

  • Que: उजनी धरण प्रकल्पाद्वारे किती रोजगार निर्मिती अपेक्षित आहे?

    Ans: या प्रकल्पातून सुमारे २,८०० कायमस्वरूपी आणि बांधकामाचा टप्पा, पुरवठा साखळी व पूरक सेवांसह एकूण सुमारे ४०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ujani dam infrastructure project jw global the seed marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Ujani Dam Water Stock 2026: कोण पळवू पाहतंय उजनीचं पाणी? सोलापूरची जीवनवाहिनी धोक्यात
1

Ujani Dam Water Stock 2026: कोण पळवू पाहतंय उजनीचं पाणी? सोलापूरची जीवनवाहिनी धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.