Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ujani Dam Water Stock 2026: कोण पळवू पाहतंय उजनीचं पाणी? सोलापूरची जीवनवाहिनी धोक्यात

Ujani Dam Water Stock 2026: कर्नाटकची सात टीएमसीची मागणी, रब्बीचे आवर्तन, उन्हाळ्यातील पाणीपुरवठा आणि बाधीभवनामुळे होणारी घट, अशा सर्व बाबींचा विचार करूनच उजनीच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट अहवाल मागविल्याने काळजी वाढली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 06, 2026 | 05:59 PM
Ujani Dam Water Stock 2026, Karnataka Demands Ujani Water 7 TMC

Ujani Dam Water Stock 2026, Karnataka Demands Ujani Water 7 TMC

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटक सरकारचा ७ टीएमसीचा दावा
  • उजनीच्या पाणीसाठ्यात ३५% घट
  • मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये
Ujani Dam Water News: सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर आता कर्नाटकनेही दावा केला आहे. विजापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या गावांच्या सरकारने पाणीपुरवठ्यासाठी कर्नाटक उजनीतून तब्बल सात टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई गंभीर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजनीतील उपलब्ध जलसाठा, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई, बाष्पीभवन आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीबाबतची माहिती तातडीने मागविली आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचे नियोजन आता राज्य सरकारच्या रडारवर आले आहे.

Ratnagiri: जमिनी दिल्या, घरे सोडली; तरीही प्रश्न प्रलंबित! कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

गतवर्षी याच कालावधीत उजनी धरण शंभर टक्के भरलेले होते. यंदा मात्र धरणातील पाणीसाठा सुमारे ६५ टक्क्यांवर आला असून, गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांची घट झाली आहे. ४ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार धरणात ३५.३० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सोलापूर शहरासह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना उजनीवर अवलंबून आहेत. आगामी उन्हाळ्यात १ नोव्हेंबर ते ३१ मे या कालावधीत बाष्पीभवनामुळे सुमारे नऊ टीएमसी पाणी कमी होण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. आता पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

 

रब्बीसाठी आवर्तन सोडण्याची दाट शक्यता

नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला शेतीसाठी आवर्तन सोडण्याची शक्यता आहे. मात्र, मर्यादित जलसाठा आणि आगामी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची गरज पाहता आवर्तनाचा निर्णय प्रशासनासाठी कसोटीचा ठरणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली या आठवड्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे, या बैठकीत पाण्याच्या वापराचे प्राधान्यक्रम आणि संभाव्य आवर्तनाबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Sugar Price Hike : साखर पुन्हा महागणार का? साखरेचे दर वाढवण्यासाठी सरकारकडे मोठी मागणी; काय आहेत कारणं?

कर्नाटकाकडून सात टीएमसी पाण्याची मागणी

कर्नाटकची सात टीएमसीची मागणी, रब्बीचे आवर्तन, उन्हाळ्यातील पाणीपुरवठा आणि बाधीभवनामुळे होणारी घट, अशा सर्व बाबींचा विचार करूनच उजनीच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट अहवाल मागविल्याने काळजी वाढली आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उजनी धरणातील सध्याचा पाणीसाठा, उन्हाळ्यातील संभाव्य स्थिती, बाष्पीभवनामुळे होणारी घट, पाणीपुरवठा योजनांची गरज आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीबाबतची माहिती तातडीने मागविली. जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाणी आणि संभाव्य वापराचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याचे अंतिम नियोजन निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
-एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

 

Web Title: Ujani dam water crisis solapur karnataka claim news as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Solapur News
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Solapur News : प्रा. रामदास झोळ यांना जीवे मारण्याची धमकी! राणा सूर्यवंशी विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
1

Solapur News : प्रा. रामदास झोळ यांना जीवे मारण्याची धमकी! राणा सूर्यवंशी विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज
2

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज

Solapur News : सोलापूरमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी १० कोटींचे निवारा केंद्र! १ हजार कुत्र्यांना मिळणार आसरा
3

Solapur News : सोलापूरमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी १० कोटींचे निवारा केंद्र! १ हजार कुत्र्यांना मिळणार आसरा

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला
4

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.