Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC Pension Update: अर्बन कंपनी–HDFC पेन्शन यांचे ऐतिहासिक पाऊल! NPC अंतर्गत नवी पेन्शन योजना होणार सुरू 

अर्बन कंपनीने ५०,००० हून अधिक सेवा व्यावसायिकांना निवृत्तीची सुरक्षा प्रदान करण्यासाठी एचडीएफसी पेन्शनसोबत भागीदारी करून 'एनपीएस प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल' सुरू केले आहे. ज्यामुळे व्यावसायिकांचे भविष्य सुरक्षित होणार आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 03, 2026 | 03:02 PM
HDFC Pension Update: अर्बन कंपनी–HDFC पेन्शन यांचे ऐतिहासिक पाऊल! NPC अंतर्गत नवी पेन्शन योजना होणार सुरू 

HDFC Pension Update: अर्बन कंपनी–HDFC पेन्शन यांचे ऐतिहासिक पाऊल! NPC अंतर्गत नवी पेन्शन योजना होणार सुरू 

Follow Us
Close
Follow Us:
  • ५० हजार गिग वर्कर्सना मिळणार भविष्याची हमी
  • अर्बन कंपनी आणि HDFC पेन्शन होणार एकत्र
  • अर्बन कंपनी पार्टनर्ससाठी एनपीएस सुविधा
 

HDFC Pension Update: भारताची राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएससाठीचा सर्वात मोठा पॉइंट ऑफ प्रेझन्स तसेच खासगी क्षेत्रातील पेन्शन फंड अशी ओळख असलेल्या एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडने अर्बन कंपनी प्लॅटफॉर्मवरील ५०,००० सर्व्हिस पार्टनर्ससाठी ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल’ अंमलात आणण्यासाठी अर्बन कंपनीबरोबर सहयोग साधला आहे. या उपक्रमामुळे अर्बन कंपनीच्या सेवा व्यावसायिकांना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA)द्वारे विनियमित सेवानिवृत्ती बचत योजनेमध्ये आपले नाव स्वेच्छेने दाखल करणे शक्य होणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून सेवा व्यावसायिकांना सुलभीकृत व अखंडित पद्धतीने संरचित नियोजन प्राप्त होऊ शकणार आहे.

एचडीएफसी पेन्शनने गिग वर्कर्सचे सेवानिवृत्ती पश्चातचे आयुष्य सुरक्षित करण्यास मदत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म अॅग्रिगेटर्सशी भागीदारी करणारी पहिली एनपीएस PoP बनत एनपीएस प्लॅटफॉर्म वर्कर्स योजनेसाठी जागा तयार केली आहे. अर्बन कंपनीशी केलेल्या या सहयोगामुळे त्यांच्या सेवा व्यावसायिकांना संरचित सेवानिवृत्ती योजना सहजपणे प्राप्त करता येणार आहे. भारतभरातील वेगवेगळ्या समाज गटांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा पुरवण्याच्या ध्येयाशी अर्बन कंपनी आणि एचडीएफसी पेन्शन या दोन्ही संस्था मेळ साधून आहेत.

Liberty General Insurance: मोटर विम्याचा अनुभव बदलणार! लिबर्टी जनरल इन्शुरन्सकडून ‘लिबर्टी अशुअर’ लाँच

या भागीदारीच्या माध्यमातून सेवा व्यावसायिकांना त्यांची योजनेत टाकायची रक्कम निवडता येईल व अगदी लहान का होईना पण नियमितपणे टाकलेल्या रकमेतून त्यांना स्वत:साठी एका सेवानिवृत्ती निधीचा संचय करता येईल. यातून मिळणारे फायदे एकरकमी रक्कमेच्या किंवा एका नियमित काळाने जसे की दर महिन्याला मिळणाऱ्या पेआऊटच्या रूपात मिळू शकतील. एचडीएफसी पेन्शन एनपीएस प्लॅटफॉर्म कमालीची लवचिकताही देऊ करतो, ज्यात वेगळ्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित होणाऱ्यांना पोर्टेबिलिटीचीही सोय अंतर्भूत आहे. इतकेच नव्हे, तर दोन्ही भागीदारांमधील डिजिटल एकात्मिकरणामुळे केवायसी प्रक्रिया विनासायास पार पडते व ऑन-बोर्डिंगही सोपे होते.

संलग्नतेच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून एचडीएफसी पेन्शन योजनेत टाकण्यात आलेल्या पैशांचे व्यवस्थापन करेल व त्यायोगे ऑन-बोर्डिंग, अकाउंट मॅनेजमेंट व दीर्घकालीन सेवानिवृत्ती योजनेचा एक अखंडित डिजिटल अऩुभव पुरवेल, त्याचवेळी अर्बन कंपनी आपल्या सेवा भागीदारांच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये या कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करेल व तो उपलब्ध करून देईल. या घडामोडीविषयी बोलताना अर्बन कंपनीचे को-फाउंडर व सीईओ अभिराज सिंग भाल म्हणाले, “एचडीएफसी पेन्शनबरोबरची आमची भागीदारी म्हणजे आमच्या सेवा व्यावसायिकांसाठी सेवानिवृत्तीच्या नियोजनाचे संस्थाकरण करण्याच्या दिशेने आम्ही उचललेले एक अर्थपूर्ण पाऊल आहे. आमच्या पार्टनर्सच्या कल्याणामध्ये आम्ही दीर्घकाळापासून केलेल्या गुंतवणूकीचा पाया या प्रयत्नांना लाभला आहे, ज्यात: कौशल्य विकास, विमा, पतपुरवठा व स्थिर उत्पन्न यांचा समावेश आहे आणि यातून अधिक शाश्वत व समावेशक परिसंस्थेप्रती आमची बांधिलकी पुन:प्रस्थापित झाली आहे.”

RBI Interest Rate Update: आरबीआयच्या होणाऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दर ‘जैसे थे’ राहणार? RBI कडून स्पष्ट संकेतांची अपेक्षा

एचडीएफसी पेन्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्रीराम अय्यर म्हणाले, “गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स हे भारताच्या बदलत्या मनुष्यबळाचा एक अनिवार्य भाग आहेत. त्यांना संरचित सेवानिवृत्ती उपाययोजना उपलब्ध करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अर्बन कंपनीसोबतच्या सहयोगाच्या माध्यमातून, आम्ही प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी नॅशनल पेन्शन योजना अधिक सहजप्राप्य, सोपी व डिजिटलदृष्ट्या सहाय्यभूत करत ही दरी सांधण्याच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. पेन्शनचे छत्र विस्तारण्याप्रती व भारताच्या वाढत्या गिग अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेला आधार देण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतिबिंब या उपक्रमामध्ये पडले आहे.”

२०३० सालापर्यंत २३.५ दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाज असलेल्या भारताच्या प्लॅटफॉर्म मनुष्यबळाला जागरुकता व उपलब्धतेच्या अभावी औपचारिक सेवानिवृत्ती नियोजनाखाली येणाऱ्या लोकसंख्यागटातून मोठ्या प्रमाणात वगळले जाते. या प्रयत्नांच्या माध्यमातून भारतभरातील मनुष्यबळासाठी संघटित सेवानिवृत्ती नियोजनाची उपलब्धता अधिक विस्तारण्याचा एचडीएफसी पेन्शन फंडाचा हेतू आहे. आतापर्यंत एचडीएफसी पेन्शनने वेगवेगळ्या सहयोग्यांच्या माध्यमातून एनपीएस वर्कर्स मॉडेलच्या मार्गे जवळ-जवळ एक लाख गिग वर्कर्सना सहभागी करून घेतले आहे. या कार्यचौकटीमुळे प्लॅटफॉर्म्सशी जोडलेल्या गिग वर्कर्सना विशिष्ट कालांतराने लहान रक्कम भविष्यनिर्वाह निधीमध्ये टाकण्याची व निवृत्तीनंतर एकगठ्ठा रकमेच्या व पेन्शनच्या रूपात काढून घेता येईल असा सेवानिवृत्ती बचत निधी तयार करण्याची मुभा मिळते

Web Title: Urban company hdfc pension launch nps model for gig and platform workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • HDFC Bank
  • Pension

संबंधित बातम्या

Union Budget 2026: सामान्य माणसांची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 
1

Union Budget 2026: सामान्य माणसांची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 

Economic Survey 2026: देशाची सामाजिक सुरक्षा भक्कम; पेन्शन आणि विमा कव्हरेजमध्ये मोठी झेप
2

Economic Survey 2026: देशाची सामाजिक सुरक्षा भक्कम; पेन्शन आणि विमा कव्हरेजमध्ये मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.