Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Vedanta Dividend Record Date : उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांत लिमिटेडने कंपनीच्या यशस्वी डिमर्जरनंतर आपल्या भागधारकांसाठी Dividend ची मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. यामुळे आज शेअर बाजारात वेदांताच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिकची मोठी तेजी पाहायला मिळाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 06, 2026 | 01:30 PM
Vedanta चा मोठा धमाका! (सौजन्य - सोशल मीडिया )

Vedanta चा मोठा धमाका! (सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Vedanta चा मोठा धमाका!
  • कंपनीने केली Dividend ची घोषणा
  • शेअर्समध्ये जोरदार तेजी
Vedanta Dividend Record Date : अनिल अग्रवाल यांच्या वेदांताने आपल्या गुंतवणूकदारांना एक महत्त्वपूर्ण बातमी दिली आहे. या बातमीसह शेअर मार्कटमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ३% मोठी उसळी पाहायला मिळाली. खरं तर या वाढीचे मुख्य कारण डिमर्जर असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने आपलं विधाजन झाल्यानंतर म्हणजे स्प्लिटनंतरच्या पहिल्या अंतरिम वेदांता डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. येत्या काळात गुंतवणूकदारांना याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे? नेमका काय परिणाम होणार आहे?  ( Vedanta Dividend Record Date ) 

GST बाबत मोठा निर्णय लांबणीवर! Council Meeting ची तारीख पुन्हा बदलली; नेमकं काय आहे कारण?

वेदांता डिव्हिडंडची तारीख निश्चित?

वेदांताच्या मॅनेजमेंट टीमने आगामी आर्थिक वर्षासाठी आपला पहिला अंतरिम डिविडेंड जाहीर केला आहे. कंपनीने या लाभांशासाठी १४ ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. पण याबाबत फायनल घोषणा ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या म्हणजेच बोर्ड मिटिंगमध्ये केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे वेदांताची पाच स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी झाल्यापासूनचा हा पहिला लाभांश असणार आहे. म्हणूनच कंपनीबाबत आणि डिविडेंडबाबत शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीकडून लाभांशाची घोषणा करताच, गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवली आणि त्यामुळे शेअरमध्ये दमदार उसळी पाहायला मिळाली.

डीमर्जरनंतर डिविडेंडचं गणित कसं बदलेल?

बाजार तज्ज्ञ आणि आर्थिक विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदारांना मोठा लाभांश देण्याची वेदांताची जुनी परंपरा कायम राहू शकते, मात्र यांच्या पद्धतीमध्ये थोडा बदल होऊ शकतो. आता वेदांताचा व्यवसाय पाच स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागला गेल्यामुळे, प्रत्येक कंपनीचा नफा आणि रोख प्रवाह वेगवेगळा असणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, भविष्यात या विभक्त कंपन्यांकडून मिळणारा डिविडेंड थेट जागतिक वस्तूंच्या किमतींवर जसे की धातू, तेल आणि वायू यांच्यावर अवलंबून असणार आहे. पूर्वी, एक संयुक्त कंपनी म्हणून वेदांता भरीव लाभांश देत असे. मात्र डीमर्जरनंतर, प्रत्येक व्यवसायाच्या स्वतःच्या विशिष्ट गरजा असणार आहेत. ज्यामुळे भविष्यात लाभांशाच्या रकमेत काही चढ-उतार होऊ शकतात.

गुंतवणूकदारांनी याकडे कसं पहावं?

जर तुम्ही वेदांताचे गुंतवणूकदार असाल, तर या बातमीचा तुमच्यासाठी अनेक अर्थ असू शकतात. जर तुम्हाला अंतरिम डिविडेंडचा लाभ घ्यायचा आहे तर, तुमच्या डिमॅट अकाऊंटमध्ये ठरवलेल्या रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स असणं आवश्यक आहे. कारण कंपनीच्या नोंदींमध्ये नोंदणीकृत होण्याकरिता आणि कंपनीकडून मिळणाऱ्या डिविडेंडचा तुम्हाला फायदा मिळेल.

किती कंपन्यांमध्ये वेदांताचे विभाजन?

ही कंपनी पूर्वी वेदांता लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर तिचे पाच कंपन्यांमध्ये विभाजन झाले:

वेदांता लिमिटेड (मूळ कंपनी/अस्तित्वात असलेली कंपनी, ज्यात हिंदुस्तान झिंक कंपनीचा समावेशही आहे)
वेदांता ॲल्युमिनियम मेटल लिमिटेड (ॲल्युमिनियम व्यवसाय)
वेदांता ऑइल अँड गॅस लिमिटेड (तेल आणि वायू व्यवसाय)
वेदांता पॉवर लिमिटेड (ऊर्जा व्यवसाय)
वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेड (लोहखनिज आणि पोलाद व्यवसाय)

( Desclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

…तर पशू आरोग्य सुधारल्यास घडेल ‘विकसित भारत’; गोदरेज ॲग्रोव्हेटच्या चेअरपर्सन Burjis Godrej यांचं पशू संवर्धनाबाबत विधान

Web Title: Vedanta announces dividend record date post demerger share price marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • share market
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
1

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली
2

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची संधी? सकारात्मक पातळीवर होणार सुरुवात, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची संधी? सकारात्मक पातळीवर होणार सुरुवात, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.