
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन विजय सेल्सने आपल्या बहुप्रतिक्षित ओपन बॉक्स क्लिअरन्स सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, स्मार्ट गॅजेट्स आणि मनोरंजनाशी संबंधित उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. मर्यादित कालावधीसाठी सुरू असलेला हा सेल देशभरातील सर्व विजय सेल्स स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. या सेलमध्ये डिस्प्ले युनिट्स आणि शिल्लक स्टॉकवरील उत्पादनांवर विशेष ऑफर्स देण्यात येत आहेत.
EPFO ने 34 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात जमा केले 8.25% व्याज? तुमच्या खात्यात आले का? कसे तपासाल
या सेलमध्ये वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह आणि इतर होम अप्लायन्सेसवर 40 ते 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. काही निवडक टीव्ही मॉडेल्सवर तब्बल 70 टक्क्यांपर्यंत सवलत असून, साऊंडबार्स, ब्लूटूथ हेडफोन्स, स्मार्टवॉचेस आणि इतर स्मार्ट गॅजेट्सही कमी किमतीत उपलब्ध आहेत. तसेच मर्यादित स्टॉकमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन आणि अॅपलची निवडक उत्पादनेही क्लिअरन्स किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी सांगितले की, ग्राहकांना सर्वोत्तम ब्रँड्सवरील दर्जेदार उत्पादने परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हा या सेलचा उद्देश आहे. घराचे आधुनिकीकरण असो किंवा नवीन गॅजेट्सची खरेदी, ग्राहकांना या सेलमधून मोठी बचत करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अमेरिकन एक्स्प्रेस, एचएसबीसी, वनकार्ड, एयू स्मॉल फायनान्स बँक, येस बँक आणि डीबीएस बँकेच्या निवडक कार्डांवर ईएमआय आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर त्वरित सवलतींचाही लाभ ग्राहकांना मिळणार आहे. ‘मायव्हीएस लॉयल्टी’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक खरेदीवर लॉयल्टी पॉइंट्सही दिले जाणार आहेत. मर्यादित कालावधीसाठी सुरू असलेल्या या क्लिअरन्स सेलमध्ये ग्राहकांना प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी मिळणार असून, विविध बँक ऑफर्समुळे बचतीत आणखी भर पडणार आहे.