Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ते सुरक्षिततेबाबत संशोधनाचं म्हणणं काय? 10 पैकी 9 जण सुरक्षित? पण कमी वाहतूक तज्ज्ञ याच्याशी सहमत

ब्रेम्बोच्या सहकार्याने इकोनॉमिस्ट एंटरप्राइजच्या संशोधनात रस्ते सुरक्षेबाबत सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूक तज्ज्ञांच्या मतांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2026 | 06:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

ब्रेम्बोच्या सहकार्याने इकोनॉमिस्ट एंटरप्राइजने केलेल्या नव्या संशोधनात रस्ते सुरक्षेबाबत सर्वसामान्य नागरिकांचा आत्मविश्वास आणि वाहतूक तज्ज्ञांचे मूल्यांकन यांच्यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. ‘सेफ्टी इन मोशन: ड्रायव्हिंग ट्रस्ट इन मॉडर्न मोबिलिटी’ या अहवालात जगातील प्रमुख १० वाहन बाजारपेठांतील नागरिक आणि तज्ज्ञांच्या मतांचा अभ्यास करण्यात आला आहे.

Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज

संशोधनानुसार, जगातील दहापैकी नऊ जणांना दैनंदिन प्रवासात स्वतःला सुरक्षित वाटते, मात्र केवळ ४५ टक्के वाहतूक तज्ज्ञच या मताशी सहमत आहेत. विशेष म्हणजे ब्राझील, चीन आणि भारतात ही तफावत सर्वाधिक असून, सुमारे ९४ टक्के नागरिकांना रस्ते सुरक्षित वाटत असले तरी केवळ १८ टक्के तज्ज्ञांनी त्याला दुजोरा दिला आहे. या देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाणही तुलनेने अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संशोधनात अति-आत्मविश्वास हा रस्ते सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. वाहनांमधील आधुनिक ड्रायव्हर-असिस्टन्स तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर, त्याबद्दलचे अपुरे ज्ञान आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे चालक अनावश्यक जोखीम घेत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तब्बल ६५ टक्के तज्ज्ञांच्या मते, अशा तंत्रज्ञानाच्या जाहिराती त्याच्या क्षमतांचा अतिरंजित दावा करतात.

अहवालात सामाजिक आणि आर्थिक स्तरानुसारही सुरक्षिततेच्या भावनेत फरक दिसून आला आहे. कमी उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास तुलनेने कमी असून, मिलेनियल्स सर्वाधिक आत्मविश्वासू असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. दुसरीकडे, जेन-झेड आणि बेबी बूमर्समध्ये तुलनेने अधिक असुरक्षिततेची भावना दिसून आली.

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

रस्ते सुरक्षित वाटत असले तरी ८८ टक्के नागरिकांनी कमी वेगमर्यादा, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि अधिक प्रभावी सुरक्षा उपायांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ६८ टक्के वाहतूक तज्ज्ञांच्या मते, नियामक संस्था आणि वाहन उद्योग यांच्यातील समन्वयाचा अभाव हा रस्ते सुरक्षेतील सुधारणांसमोरील सर्वात मोठा अडथळा आहे.

संशोधकांच्या मते, रस्ते सुरक्षेबाबतचा विश्वास केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर नव्हे, तर प्रभावी धोरणे, पारदर्शक नियमन, जनजागृती आणि जबाबदार नवोपक्रम यांवर आधारित असला पाहिजे. रस्ते सुरक्षेवरील विश्वास कमवावा लागतो, तो गृहीत धरून चालता येत नाही, असा निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आला आहे.

Web Title: What does brembo research say about road safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Hindenburg Research

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.