Todays Gold-Silver Price: 22 कॅरेट सोन्याच्या खरेदीसाठी मोजावे लागणार लाखो रुपये, चांदीच्या किंमतीत तुफान वाढ
भारतात काल 12 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,050 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,129 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,287 रुपये आहे. भारतात काल 10 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,030 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,111 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,273 रुपये होता.
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,499 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 82,870 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 82,730 रुपये होता. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 129.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,29,800 रुपये आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 11 सप्टेंबर रोजी भारतातील अनेक शहरांत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,499 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 82,870 रुपये आहे. सोन्याच्या दराने सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सध्या भारतीयांना सोन्याची खरेदी करणं कठीण झालं आहे.
रिपोर्टनुसार, दिवाळीमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होणं अत्यंत सहाजिक आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. ट्रायसिटीतील ज्वेलर्सना असा अंदाज आहे की या दिवाळीत सोन्याच्या किमती आणखी वाढतील आणि लोक आता सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत, अगदी पितृपक्षाच्या काळातही, जो हिंदूंमध्ये अशुभ मानला जातो. ज्वेलर्सनी धनत्रयोदशीच्या दिवशी कमी विक्रीचा अंदाजही वर्तवला आहे.
एका ज्वेलरने दिलेल्या माहितीनुसार, काही लोकं धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या वस्तू बुक करत आहेत, ज्यामुळे किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पितृपक्षाची पर्वा न करता अनेक लोक सोने खरेदी करत आहेत. सहसा पितृपक्षात खरेदी होत नाही. पण आता लोक भविष्यात जास्त किमती मिळतील या आशेने सोने खरेदी करत आहेत. काही लोक बुकिंगही करत आहेत.
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
बंगळुरु | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
मुंबई | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
पुणे | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
कोलकाता | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
केरळ | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
नागपूर | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
हैद्राबाद | ₹1,01,290 | ₹1,10,499 | ₹82,870 |
दिल्ली | ₹1,01,440 | ₹1,10,650 | ₹83,020 |
चंदीगड | ₹1,01,440 | ₹1,10,650 | ₹83,020 |
जयपूर | ₹1,01,440 | ₹1,10,650 | ₹83,020 |
लखनौ | ₹1,01,440 | ₹1,10,650 | ₹83,020 |
सुरत | ₹1,01,340 | ₹1,10,550 | ₹82,900 |
नाशिक | ₹1,01,320 | ₹1,10,530 | ₹82,900 |