
बाजार म्हटला की पहिले डोळ्यासमोर येतो तो डी मार्ट. बिग बाजार, मॉलच्या तुलनेत D Mart ला भारतीय मोठ्या प्रमाणात पसंती देतात. पण तुम्हाला माहितेय का D Mart कसं सुरु झालं आणि ते कोणी केलं, जाणून घेऊयात मागील गोष्ट.
भारतामधील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह म्हणून ओळखला जाणारा D-Mart आज लाखो ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. या D Mart ची सुरुवात झाली2002 मध्ये. भारतीयांची गरज लक्षात घेत गुंतवणूकदार आणि उद्योजक राधाकिशन शिवकिशन दामानी यांनी मुंबईमध्ये D-Mart चे पहिले स्टोअर सुरू केले.गुंतवणूकदार आणि उद्योजक राधाकिशन शिवकिशन दामानी यांनी मुंबईमध्ये D-Mart चे पहिले स्टोअर सुरू केले. शेर बाजारातील तज्ज्ञ पण तरीही साधेपणाने जगणारे दामानी यांनी रिटेल व्यवसायात प्रवेश करताना ग्राहकांच्या गरजा, बाजारातील स्पर्धा आणि खर्च नियंत्रण यांचा सखोल अभ्यास केला.
D-Mart च्या यशामागे सर्वात मोठं कारण म्हणजे परवडणाऱ्या किंमतीतल्या वस्तू. दैनंदिन वापरातील वस्तू कमी दरात देणे, चांगल्या गुणवत्तेची खात्री राखणे आणि ग्राहकांचा विश्वास कमावणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा ही असतेच ते दमानी यांना देखील हे चुकलं नाही. बीग बाजारसारखी मोठमोठी आकर्षक केंद्रे उभारत असताना D-Mart ने साधेपणा, मर्यादित सजावट आणि खर्च नियंत्रण यावर भर दिला. दुकाने चालवण्यासाठी लागणारा खर्च कमी ठेवून ग्राहकांना नफा मिळवून देणे हे धोरण अत्यंत परिणामकारक ठरले.
D-Mart चा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःची मालकी असलेली स्टोअर्स. बहुतेक रिटेल चेन भाड्याने जागा घेतात, मात्र D-Mart ने दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी अनेक जागा थेट खरेदी केल्या. यामुळे त्यांचे ऑपरेशन स्थिर, नफा जास्त आणि विस्तार नियंत्रित ठेवणे शक्य झाले. कंपनीने विस्तारात कधीही घाई केली नाही. हळूहळू आणि अभ्यासपूर्वक नवीन ठिकाणी स्टोअर्स उघडण्याची रणनीती अवलंबली. त्यांची सप्लाय चेन व्यवस्थित, जलद आणि खर्चिकदृष्ट्या परिणामकारक आहे.
थेट उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते ग्राहकांना सातत्याने कमी दरात वस्तू उपलब्ध करून देतात.आज D-Mart देशभरात शेकडो स्टोअर्ससह कार्यरत आहे आणि नफा सर्वाधिक मिळवणाऱ्या रिटेल कंपन्यांत अग्रेसर आहे. राधाकिशन दामानी यांची दूरदृष्टी, साधेपणा आणि ग्राहक-केंद्रित विचार यामुळेच D-Mart भारतातील सर्वसाधारण कुटुंबाचे लोकप्रिय खरेदी केंद्र बनले आहे.
दमाणी यांनी परदेशातील मोठ्या रिटेल चेनचा व्यवसाय जवळून पाहिला. Walmart सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करून कमी किंमतीत विकतात, हे मॉडेल भारतात वापरता येईल असे त्यांना वाटले. दमाणी यांनी भारतातील किराणा बाजाराचा अभ्यास केला. लोकांना दैनंदिन वस्तू कमी किमतीत आणि विश्वासार्ह गुणवत्तेत मिळाव्यात यावर त्यांनी भर दिला. त्यातून “लो प्राइस – एव्हरी डे प्राइस” ही संकल्पना तयार झाली.
Ans: भारतातील मध्यमवर्गाचा अभ्यास करून कमी किमतीत उत्तम वस्तू देणारे स्टोअर तयार करायचे होते.
Ans: कारण ते अनावश्यक खर्च टाळतात, आणि त्याचा फायदा ग्राहकाला कमी किमतीत देतात.
Ans: साधेपणा, कमी खर्च, ग्राहक-केंद्रितता आणि विश्वास.