Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्युच्युअल फंडमधील तुमची गुंतवणूक आता अधिक सुरक्षित; SEBIने गुंतवणूकदारांना दिलं ‘डेबिट फ्रीज’चं नवं फिचर!

गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वेगाने वाढली आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक करणं सोपे झाले असलं, तरी सायबर फसवणुकीचे प्रकार आणि अनधिकृत व्यवहारांची भीतीही वाढली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 05:38 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • सेबीने गुंतवणूकदारांसाठी एक अभिनव सुविधा जाहीर केली
  • डीमॅट, नॉन-डीमॅट दोन्ही प्रकारच्या फोलिओवर लागू
  • या सुविधेचा लाभ कोणाकोणाला? 
SEBI New Rules Mutual Fund : भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI) म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या हितासाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीला अधिक सुरक्षा कवच देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वेगाने वाढली आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक करणं सोपे झाले असलं, तरी सायबर फसवणुकीचे प्रकार आणि अनधिकृत व्यवहारांची भीतीही वाढली आहे. हीच जोखीम ओळखून सेबीने गुंतवणूकदारांसाठी ‘वॉलंटरी डेबिट फ्रीज’ नावाची एक अभिनव सुविधा जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आता तुमची म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक सुरक्षित होणार आहे.

Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन

डीमॅट, नॉन-डीमॅट दोन्ही प्रकारच्या फोलिओवर लागू

ही नवीन सुविधा 30 एप्रिल 2026 पासून सेवा सुरु होणार आहे. ती डीमॅट आणि नॉन-डीमॅट अशा दोन्ही प्रकारच्या फोलिओवर लागू असेल. या सुविधेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, गुंतवणूकदार स्वतःच्या इच्छेनुसार आपला म्युच्युअल फंड फोलिओ ‘लॉक’ करू शकतात. जोपर्यंत गुंतवणूकदार स्वतःहून तो फोलिओ ‘अनलॉक’ करत नाही, तोपर्यंत त्यातून कोणत्याही युनिटची विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही.

या सुविधेचा लाभ कोणाकोणाला?

थोडक्यात सांगायचे तर, तुमच्या संमतीशिवाय तुमच्या खात्यातून एक रुपयाचीही हालचाल होणार नाही. ही सुविधा सुरूवातीच्या टप्प्यात ‘रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट’ यांच्याद्वारे ‘एमएफ सेंट्रल’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. तथापि, ज्या गुंतवणूकदारांची केवायसी (KYC) पूर्ण आहे आणि ज्यांचे ईमेल आयडी व मोबाईल नंबर अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत, केवळ त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) कडे जबाबदारी

या सुविधेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) कडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एम्फी (AMFI) या सुविधेच्या कामकाजासाठी एक विस्तृत नियमावली तयार करणार आहे. या काळात नेमके कोणते आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार करण्याची मुभा असेल, याचे स्पष्ट निकष एम्फीद्वारे ठरवले जातील. तसेच, सर्व फंड हाऊस आणि आरटीए (RTAs) यांना या संपूर्ण प्रक्रियेची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आणि गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या कागदपत्रांमध्ये पारदर्शकपणे प्रसिद्ध करणे बंधनकारक असेल.

डिजिटल आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्यंत प्रभावी

सेबीचे हे पाऊल भविष्यातील डिजिटल आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या व्यापासोबतच सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. आता गुंतवणूकदार आपल्या फोलिओला स्वतःच सुरक्षित कुलूप लावू शकतील, ज्यामुळे सायबर फ्रॉडची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येईल. गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सेबीचा हा निर्णय गुंतवणूकदारांमध्ये मोठा विश्वास निर्माण करणारा असून, म्युच्युअल फंड क्षेत्रातील डिजिटलायझेशनला एक नवे आणि सुरक्षित वळण देणारा ठरणार आहे. आता कोणत्याही भीतीशिवाय गुंतवणूकदार आपल्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांच्या दिशेने निश्चिंतपणे वाटचाल करू शकतील.

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

Web Title: Sebi new rules mutual fund folio lock unlock safety debit freeze facility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Business News
  • e-KYC
  • KYC
  • sebi

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!
1

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
2

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या
4

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.