Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या (EPFO) महत्त्वपूर्ण बैठकीत, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पीएफवरील व्याजदर ८.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 08:16 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी
  • व्याज कायदेशीररित्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
  • आता कर्मचाऱ्यांना पीएफ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत
PF Interest Rate: ज्या नोकरदार वर्गाच्या पगारातून दरमहा पीएफ (Provident Fund) कापला जातो, त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या (EPFO) महत्त्वपूर्ण बैठकीत, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पीएफवरील व्याजदर ८.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी सरकारने व्याजदरात कोणताही बदल न करता तो स्थिर ठेवला आहे. जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार आणि अस्थिरता असूनही, एफडी किंवा पीपीएफ सारख्या इतर बचत योजनांच्या तुलनेत ८.२५ टक्के व्याजदर हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक मानला जात आहे.

डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

ऑटो-सेटलमेंट

EPFOची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ने (CBT) या व्याजदराची शिफारस केली असून, आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर कामगार मंत्रालयामार्फत अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल आणि त्यानंतरच हे व्याज कायदेशीररित्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. केवळ व्याजदरच नव्हे, तर या बैठकीत अनेक वर्षांपासून पडून असलेल्या ‘इनऑपरेटिव्ह’ (निकामी) खात्यांबाबतही एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

SOP आणि डिजिटल पारदर्शकता

ज्या खात्यांमध्ये १,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे आणि जी खाती बऱ्याच काळापासून बंद आहेत, अशा खात्यांमधील पैशांचे सेटलमेंट आता ‘ऑटोमॅटिक’ पद्धतीने केले जाणार आहे. म्हणजेच, या छोट्या रकमेसाठी आता कर्मचाऱ्यांना पीएफ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. या निर्णयाचा फायदा सुमारे १.३३ लाख खातेदारांना होणार असून, जवळपास ५.६८ कोटी रुपये त्यांच्या खऱ्या वारसांपर्यंत किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. याशिवाय, ईपीएफओने आपली कार्यप्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी नवीन ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (SOP) जारी केली आहे. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस करण्यावर भर देण्यात आला असून, यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात अधिक गती येईल.

कर्जमाफी योजना

कर्मचारी आणि कंपन्यांमधील जुने वाद मिटवण्यासाठी सरकारने एक ‘ॲम्नेस्टी स्कीम’ (Amnesty Scheme) देखील सुरू केली आहे. ज्या कंपन्या नियमांचे पालन करण्यात मागे राहिल्या आहेत, त्यांना आता मोठा दंड न भरता आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पैशांची सुरक्षा सुनिश्चित होईल. तसेच, ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय या योजनांचे स्वरूप आता ‘सोशल सिक्युरिटी कोड २०२०’ नुसार बदलण्यात आले आहे. या बदलांमुळे पेन्शन आणि विम्याचे नियम अधिक सुटसुटीत होणार असून, कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होतील. एकंदरीत, सरकारचा हा कल केवळ व्याजदरापुरता मर्यादित नसून, संपूर्ण पीएफ प्रणाली ‘युजर फ्रेंडली’ करण्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

म्युच्युअल फंडमधील तुमची गुंतवणूक आता अधिक सुरक्षित; SEBIने गुंतवणूकदारांना दिलं ‘डेबिट फ्रीज’चं नवं फिचर!

Web Title: Pf interest rate announced for this year other important announcements was also made in epfo meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

पुणे मिसिंग लिंकमुळे महत्त्वाचा अडथळा दूर, स्थावर मालमत्ता आणि गोदाम व्यवस्थेसाठी नवीन वाढीचा मार्ग खुला
1

पुणे मिसिंग लिंकमुळे महत्त्वाचा अडथळा दूर, स्थावर मालमत्ता आणि गोदाम व्यवस्थेसाठी नवीन वाढीचा मार्ग खुला

Govertment Business :  एक ‘असा’ सरकारी व्यवसाय ज्याला पदवीधर शिक्षणाची गरज नाही ; कसं ते जाणून घ्या सविस्तर
2

Govertment Business : एक ‘असा’ सरकारी व्यवसाय ज्याला पदवीधर शिक्षणाची गरज नाही ; कसं ते जाणून घ्या सविस्तर

SBI Bank : SBI Card धारकांसाठी मोठी बातमी! 1 मेपासून बदलले नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
3

SBI Bank : SBI Card धारकांसाठी मोठी बातमी! 1 मेपासून बदलले नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Labour Code: तुम्हीही 8-10 तासांपेक्षा जास्त काम करताय? Overtime च्या नियमात झालेत मोठे बदल, वाचा सविस्तर
4

New Labour Code: तुम्हीही 8-10 तासांपेक्षा जास्त काम करताय? Overtime च्या नियमात झालेत मोठे बदल, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.