Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली अपेक्षा

महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 07:16 PM
“विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली अपेक्षा
Follow Us
Close
Follow Us:

प्रकल्पामुळे २५०० लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार
नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल- फडणवीस
निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे मिळतेय गती

नागपूर: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका वठवावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपूर -अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशाला ग्लोबल सप्लाय चेनमध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानेही या दिशेने पुढे जाण्यासाठी उद्योगस्नेही धोरण आणले आहे. त्यामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत आहे त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे.

Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला व महाराष्ट्राला  पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय देशासमोर ठेवले असताना हे साध्य करण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची महत्वाची भूमिका ठरते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राची आर्थिक प्रगती राज्यासमोर मांडली.

एडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'XSIO एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्कच्या शुभारंभ' कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी 'XSIO एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्क'चे… pic.twitter.com/yB3UoyHDNp — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 7, 2026

आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र प्रयत्नरत आहे. त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे यास प्रत्यक्षात आणण्यात आजच्या लॉजिस्टिक पार्कची महत्त्वाची भूमिका आहे.नागपूर उद्योगाचे मॅग्नेट बनवताना एक्सएसआयओ जोरकसपणे कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. एक्सएसआयओ ने नेक्स्ट जेन बाबतही देशात अन्य ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारताना नागपुरलाही प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनवताना या पार्कने महत्वाची भूमिका वठवावी असेही ते म्हणाले.

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडून निधी मंजूर

महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच ‘इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड’ औद्योगिक संकुल आहे.

Web Title: Cm devendra fadnavis said xsio important in nagpurs development as an industrial magnet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Business News
  • CM Devedra Fadnavis
  • Nagpur

संबंधित बातम्या

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा
1

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

म्युच्युअल फंडमधील तुमची गुंतवणूक आता अधिक सुरक्षित; SEBIने गुंतवणूकदारांना दिलं ‘डेबिट फ्रीज’चं नवं फिचर!
2

म्युच्युअल फंडमधील तुमची गुंतवणूक आता अधिक सुरक्षित; SEBIने गुंतवणूकदारांना दिलं ‘डेबिट फ्रीज’चं नवं फिचर!

Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन
3

Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी
4

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.