फोटो सौजन्य: iStock
दिल्ली विधानसभेत आज भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे ते बहुमत मिळालं आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये देशभरात जल्लोष दिसून येत आहे. दिल्लीतील राजकारणात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला असून, आगामी काळात भाजपचे सरकार राजधानी दिल्लीत स्थापन होणार आहे.
या विजयाने भाजपचे मनोबल वाढवले आहे आणि त्यांच्या नेत्यांनी विजयाची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली असून, आगामी सरकार स्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे भाजपला दिल्लीमध्ये सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
एक कोटी GIG Workers साठी आनंदाची बातमी ! सरकार ‘ही’ महत्वाची सुविधा देण्याच्या तयारीत
भाजपच्या विजयानंतर, लोक सोशल मीडियावर विचारत आहेत की सोमवारी होणाऱ्या या निवडणुकीचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल. चला, या बातमीत शेअर बाजारातील तज्ञांकडून जाणून घेऊया की या निवडणूक निकालाचा बाजारावर काय परिणाम होणार आहे.
शेअर बाजारातील चढउतारांमागे अनेक घटक काम करत असतात. यामध्ये निवडणूक निकालही महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः जेव्हा केंद्रात एखाद्या पक्षाचे सरकार असते आणि त्याच पक्षाचे सरकार राज्यातही स्थापन होते, तेव्हा त्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेकदा दिसून येते.
हरियाणा असो किंवा महाराष्ट्र, दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर शेअर बाजार उंचावला होता. महाराष्ट्रात भाजप आघाडीच्या विजयानंतर शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला होता. याशिवाय, हरियाणामध्ये भाजपच्या विजयानंतर शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स ५८५ अंकांनी वधारला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे लागला आहे. राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळाल्या आहेत तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार येणार.
आता या निकालानंतर, शेअर बाजारावर याचा किती परिणाम होईल? असा कॉमन प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. याबाबत तज्ञांना विचारल्यावर ते म्हणाले की ‘सध्या परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे शेअर बाजार अडचणीत आहे. तथापि, दिल्लीतील भाजपच्या विजयामुळे केंद्र सरकार बळकट होईल, ज्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल. बाजारात तेजी येऊ शकते, परंतु या विजयाचा परिणाम बाजारात जास्त काळ टिकणार नाही.
पुढे तज्ञ म्हणतात की हरियाणा किंवा महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर शेअर बाजारात तेजी आली कारण लोकांना अपेक्षा नव्हती की या राज्यांमध्ये भाजप इतक्या ताकदीने येईल. खरंतर, बाजार आश्चर्यांना अधिक प्रतिसाद देतो. तर, दिल्लीत, आम आदमी पक्षाचे सरकार जाणार आहे हे एक्झिट पोलवरून लोकांना आधीच माहित होते.