Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Gold Rate Prediction : बापरे… यंदाच्या दिवाळीत Gold 1.80 लाखांच्या पार जाणार? Global Market मध्ये बदलतेय परिस्थिती?

Gold Rate Prediction Diwali 2026 : येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.८० लाख रुपयांच्या पार पोहोचणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या याकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे वाढते दर भाव पाहता आणि जागतिक परिस्थितीमुळे सोन्याची चकाकी बरीच वाढण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 02, 2026 | 06:02 PM
यंदाच्या दिवाळीत Gold 1.80 लाखांच्या पार जाणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

यंदाच्या दिवाळीत Gold 1.80 लाखांच्या पार जाणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • यंदाच्या दिवाळीत Gold 1.80 लाखांच्या पार जाणार?
  • Global Market मध्ये बदलतेय परिस्थिती?
  • सोन्याच्या दरात हालचाल का?
Gold Rate Prediction Diwali 2026 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं न खरेदी करण्याची विनंती केली. मात्र भारतीयांना सोनं खरेदी करण्यापासून रोखणं ही फार कठीण गोष्ट आहे. कारण इथे सोन्याला जसा एक अलंकार म्हणून पाहिलं जातं त्याचबरोबर सोन्याकडे गुंतवणूकाचा उत्तम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे सोन्याच्या खरेदीकडे नेहमीच ओघ जास्त असतो. आज 2 ऑक्टोबर कमोडिटी बाजारात कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे IBJA ने देखील सोना चांदीचे दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे देशांतर्गत बाजार थोडा शांत आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याची चमक किंचित वाढलेली पाहायला मिळाली. यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे. की दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कुठून कुठे पोहोचताहेत? नेमकी काय आहे परिस्थिती? ( Gold Rate Prediction Diwali 2026 )

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, दिवाळीपर्यंत किंवा २०२६ च्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,८०,००० रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. त्यात आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती किंचित वाढल्या आहेत. US बॉण्डवरील रिटर्न कमी झाला आहे, आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की पुढील व्याजदराचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना अधिक वेळ हवा आहे. दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या भीतीमुळे ऊर्जा क्षेत्रातही किमती वाढत चालल्या आहेत.

ब्लूमबर्गच्या माहितीत काय?

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये दुपारी स्पॉट सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,१९०.१६ डॉलरवर पोहोचला. चांदीचा भाव ०.६ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ६१.३८ डॉलरवर पोहोचला, आदल्या दिवशी त्यात ०.९ टक्क्यांची वाढ झाली होती. प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या भावातही वाढ झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत डॉलर स्पॉट इंडेक्स ०.१ टक्क्यांनी घसरला.

सोन्याच्या दरात हालचाल का?

गुरुवारी अमेरिकेच्या ट्रेझरी यील्डमध्ये सर्वत्र घट दिसून आली. १०-वर्षांचे यील्ड २४ वर्षांच्या विक्रमी पातळीखाली घसरले. फ्रान्सच्या आर्थिक परिस्थितीबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी अधिक सुरक्षित पर्यायांची निवड करण्याचा पर्याय समोर ठेवला.

सप्टेंबरमध्ये सोन्याच्या दराची ६ % ची घसरण

सोन्यावर व्याज मिळत नसल्यामुळे, जास्त रिटर्न सामान्यतः सोन्यासाठी हानिकारक असतो. सप्टेंबरमध्ये सोन्याच्या किमतीत झालेल्या ६ टक्क्यांच्या घसरणीचे हे एक प्रमुख कारण होते. फेडरल रिझर्व्हचे उपाध्यक्ष फिलिप जेफरसन म्हणाले की, व्याजदरात आणखी वाढ करण्याची गरज आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. यामुळे लवकर व्याजदर वाढण्याच्या बाजारातील अपेक्षा कमी झाल्या आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला ७० टक्के शक्यता होती, ती आता ऑक्टोबरमध्ये व्याजदर वाढीची केवळ २६ टक्के शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांना वाटते.

Navi Mumbai विमानतळावरून प्रवाशांना मोठा फटका! IndiGo ने उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात, पण नेमकं कारण काय?

Web Title: Will gold rate cross 1 80 lakhs by diwali 2026 international rates ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Diwali
  • Global Market

संबंधित बातम्या

Inflation Rate : ही Diwali खिशावर भारी! पेट्रोलपासून कांद्यांपर्यंत सोन्यापासून स्मार्टफोनपर्यंत… अरे देवा सगळंच महागणार?
1

Inflation Rate : ही Diwali खिशावर भारी! पेट्रोलपासून कांद्यांपर्यंत सोन्यापासून स्मार्टफोनपर्यंत… अरे देवा सगळंच महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.