
वातावरणातील बदलांमुळे सतत सर्दी खोकला होत असेल तर 'हे' उपाय नक्कीच करा, चोंदलेले नाक होईल मोकळे
Home Remedies For Cold: वातावरणात सतत होणारे बदल, धूळ आणि हानिकारक विषाणूंच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकदा संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. वारंवार शिंका येणे, सर्दी, खोकला, घशात खवखव आणि डोके जड होणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात. बऱ्याचदा सर्दी खोकला झाल्यानंतर दैनंदिन जीवनातील कामे करताना अनेक अडथळे निर्माण करतात. सर्दी झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच गंभीर होतात आणि आरोग्य बिघडून जाते. खोकला किंवा सर्दी झाल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात. पण वारंवार पेनकिलर किंवा कोणत्याही गोळ्यांचे सेवन केल्यामुळे थेट किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)
दिवाळी सणाला राज्यभरात सगळीकडे मोठा उत्साह असतो. दिवे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत सण साजरा केला जातो. पण फटाक्यांमध्ये असलेल्या केमिकल घटकांमुळे फुफ्फुसांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यानंतर गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी हे घरगुती उपाय करावेत. यामुळे सर्दी खोकला कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही आणि आरोग्य चांगले राहते.
सर्दी झाल्यानंतर दिवसभरात शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे फार आवश्यक आहे. कोमट पाणी प्यायल्यामुळे घशाला आराम मिळतो आणि सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. एकत्र खूप जास्त पाणी पिणे टाळावे. घशात वाढलेली खवखव, सर्दी खोकला कमी होत नसेल तर कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यावे. मधामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते.
खोकल्याची तीव्रता खूप जास्त वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन वाढल्यास शरीरसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. एक वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना मध देणे टाळावे. घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. गुळण्या केलेले पाणी गिळून टाका. सर्दी झाल्यानंतर वारंवार नाक चोंदत असेल तर सलाईन ड्रॉप्स टाकावे. नोझल स्प्रे टाकल्यामुळे नाक मोकळा होण्यास मदत होईल.
सर्दी खोकला झाल्यामुळे घशाला आराम देण्यासाठी भाज्यांचे सूप बनवून प्यावे. सूप बनवताना आले, लसूण आणि काळी मिरी इत्यादी पदार्थांचा आवश्यक वापर करावा. तसेच शरीराला विश्रांती द्यावी. सर्दी झाल्यानंतर धूळ, धूर, अगरबत्तीचा वास आणि सिगारेटच्या धुरापासून लांब उभे राहावे. घरागुती उपाय केल्यानंतर सुद्धा आराम मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.
Ans: तापमान आणि आर्द्रतेतील बदल, विषाणूंचा संसर्ग तसेच ॲलर्जी यांमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
Ans: नाक चोंदल्यास सलाईन नॅसल स्प्रे किंवा ड्रॉप्सचा वापर करता येतो. पुरेसे पाणी पिणे आणि कोमट द्रवपदार्थांचे सेवन केल्यानेही आराम मिळू शकतो.
Ans: मधामुळे घशातील खवखव आणि खोकला कमी होण्यास मदत होऊ शकते. आल्याचा कोमट काढा घेतल्यानेही काही प्रमाणात आराम मिळू शकतो.