Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad Diwali Maidan 2026: म्हसवडच्या दिवाळी मैदानात भक्ती आणि आतषबाजीचा अनोखा संगम; २७ तासांचा नवा विक्रम

Mhaswad Diwali Maidan 2026: म्हसवड येथील श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी देवी यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त पार पडणाऱ्या पारंपरिक दिवाळी मैदानाने यंदा नवा विक्रम केला आहे. तब्बल २७ तास चाललेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने गतवर्षीचा २५ तासांचा विक्रम मोडला असून, भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 13, 2026 | 12:30 PM
म्हसवडच्या दिवाळी मैदानात भक्ती आणि आतषबाजीचा अनोखा संगम

म्हसवडच्या दिवाळी मैदानात भक्ती आणि आतषबाजीचा अनोखा संगम

Follow Us
Follow Us:
  • म्हसवड येथे श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी देवी यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त दिवाळी मैदान साजरे करण्यात आले
  • भाऊबीजेच्या दिवशी बुधवारी (ता. ११) पारंपरिक दिवाळी मैदानाला सुरुवात झाली.
  • मिरवणुकीत हातात पेटत्या दिवट्या घेऊन मानकऱ्यांनी पारंपरिक सहभाग नोंदवला.
म्हसवड येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवी यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त भाऊबीजेच्या दिवशी, बुधवारी (ता. ११) सायंकाळी पारंपरिक दिवाळी मैदान मोठ्या उत्साहात आणि फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीत साजरे करण्यात आले. यंदाच्या दिवाळी मैदानाने तब्बल २७ तासांचा कालावधी घेत गतवर्षीचा २५ तासांचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे म्हसवडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत यंदाच्या दिवाळी मैदानाची ऐतिहासिक नोंद झाली आहे.

श्री सिद्धनाथ महाराज यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता वर श्री सिद्धनाथ महाराज सालकरींच्या रूपात राजबागेतील पुरातन मंदिरात विराजमान असलेल्या श्री म्हातारदेवांच्या भेटीसाठी निघतात. या पारंपरिक भेटीच्या कार्यक्रमात मंदिराचे सालकरी, मानकरी, गुरव, पुजारी यांच्यासह अनेक भाविक सहभागी होतात. धार्मिक विधी आणि भेटीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ढोलाच्या निनादात ही मिरवणूक पुन्हा श्री सिद्धनाथ मंदिराकडे मार्गस्थ होते.

या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीच्या दोन्ही बाजूंनी हातात पेटत्या दिवट्या घेऊन मानकरी सहभागी होतात. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि दिवट्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो. मिरवणूक पुढे सरकत असताना ठिकठिकाणी भाविकांकडून फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून श्री सिद्धनाथ महाराजांचे स्वागत केले जाते.

Chanakya Niti: पैसा कमावणे आणि वाचवणे दोन्ही महत्त्वाचे! जाणून घेऊया चाणक्य नीतीमधील नियम

दिवाळी मैदानाचा आनंद अधिक काळ अनुभवता यावा, या भावनेतून भाविकांकडून मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण म्हसवड शहर उजळून निघते. मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी भाविकांमध्ये जणू चढाओढच लागलेली असते. प्रत्येक ठिकाणी होणारी आतषबाजी, भाविकांचा उत्साह आणि पारंपरिक धार्मिक वातावरण यामुळे दिवाळी मैदानाला विशेष रंगत प्राप्त होते.

गतवर्षीचा २५ तासांचा विक्रम यंदा मोडला!

म्हसवडच्या दिवाळी मैदानाला ऐतिहासिक परंपरा असून दरवर्षी भाविकांच्या उत्साहामुळे या मैदानाचा कालावधी वाढताना दिसतो. गतवर्षी दिवाळी मैदानाची मिरवणूक तब्बल २५ तासांनी सायंकाळी पाच वाजता मंदिरात पोहोचली होती. हा विक्रमी कालावधी मानला जात होता.

मात्र यंदा भाविकांच्या उत्साहाने गतवर्षीचा विक्रमही मागे टाकला. यावर्षी दिवाळी मैदानाची मिरवणूक मंदिरात पोहोचण्यासाठी तब्बल २७ तासांचा कालावधी लागला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत आणखी दोन तासांची भर पडत दिवाळी मैदानाने नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला.

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी देवी यांच्या विवाह सोहळ्यातील हा पारंपरिक दिवाळी मैदानाचा सोहळा म्हसवडकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि उत्साहाचा अनोखा संगम मानला जातो. दरवर्षी वाढणारा भाविकांचा सहभाग आणि दिवाळी मैदानाचा वाढता कालावधी यामुळे या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. यंदा २७ तासांचा विक्रमी कालावधी नोंदविल्याने म्हसवडच्या धार्मिक इतिहासात दिवाळी मैदानाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे

💡

Frequently Asked Questions

  • Que: म्हसवडचे दिवाळी मैदान कोणत्या निमित्ताने साजरे केले जाते?

    Ans: श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी देवी यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त दिवाळी मैदान साजरे केले जाते.

  • Que: म्हसवडच्या दिवाळी मैदानाचा मागील विक्रम किती तासांचा होता?

    Ans: गतवर्षी दिवाळी मैदानाचा कालावधी २५ तासांचा होता. यंदा हा विक्रम दोन तासांनी मोडला

  • Que: दिवाळी मैदानाला म्हसवडमध्ये विशेष महत्त्व का आहे?

    Ans: हा उत्सव म्हसवडकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

Web Title: Mhaswad diwali maidan new record 27 hours pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Diwali
  • Mhaswad
  • Record

संबंधित बातम्या

Diwali Puja Mistake: दिवाळीच्या पूजेमध्ये नकळत तुमच्याकडून चूक झाली आहे का? देवाची क्षमा मागण्यासाठी म्हणा हे मंत्र
1

Diwali Puja Mistake: दिवाळीच्या पूजेमध्ये नकळत तुमच्याकडून चूक झाली आहे का? देवाची क्षमा मागण्यासाठी म्हणा हे मंत्र

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी
2

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी

Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट
3

Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट

Bhaubij 2026 : भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? जाणून घ्या खास कारण
4

Bhaubij 2026 : भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? जाणून घ्या खास कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.